Short News

खोदकामात आढळली पुरातन मुर्ती, अन् नाग होता रखवालदार

खोदकामात आढळली पुरातन मुर्ती, अन् नाग होता रखवालदार

परळी-अंबाजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी गावाजवळील जलालपूर शिवारात सोमवारी दुपारी जेसीबी मशिनने खाणीचे खोदकाम सुरू होते. यावेळी एक प्राचीन देवतेची मुर्ती सापडली. विशेष म्हणजे त्या मुर्तीजवळ एक काळा नागदेखील वेटोळे घालून बसला होता. ही बातमी पसरताच दृश्य पाहण्यासाठी व मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील लोकांची एकच झुंबड उडाली. गर्दी वाढल्याने त्याठिकाणी दोन पोलिस कर्मचारी तैनात करावे लागले. 
ट्रम्प यांचा झटका ! एच 1बी व्हिसाधारकाच्या जोडीदाराच्या नोकरीवर गदा ?

ट्रम्प यांचा झटका ! एच 1बी व्हिसाधारकाच्या जोडीदाराच्या नोकरीवर गदा ?

अमेरिकेतील एच 1बी व्हिसाधारकांना ट्रम्प प्रशासनाने आणखी एक धक्का देण्याची तयारी केली आहे. एच1बी व्हिसाधारक व्यक्तीच्या जोडीदाराला यापुढे अमेरिकेत नोकरी करता येणार नाही, असा नवीन नियम ट्रम्प प्रशासन करणार आहे. या निर्णयाचा फटका अमेरिकेत राहणाऱ्या हजारो भारतीय आणि त्यांच्या कुटुंबांना बसणार आहे. बराक ओबामा यांच्या कार्यकाळात एच १बी व्हिसावर संबंधित व्यक्तीच्या जोडीदारालाही नोकरीची संधी होती. 
भाजप मंत्र्यांचेच एकनाथ खडसेंविरोधात कारस्थान - कल्पना इनामदार

भाजप मंत्र्यांचेच एकनाथ खडसेंविरोधात कारस्थान - कल्पना इनामदार

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कोअर टीममधील सदस्य कल्पना इनामदार यांनी मुंबई उच्च न्यायालयात अंजली दमानिया यांच्याविरोधात एक कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. कल्पना इनामदार यांनी भाजपवरही खळबळजनक आरोप केले आहेत. भाजपच्या मंत्र्यांनीच माजी मंत्री एकनाथ खडसे यांना अडकवण्याची सुपारी दिली होती. खडसेंना मंत्रीपद मिळल्यापासून त्यांना अडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्या म्हणाल्या.
मुंबईच्या संघात 'हा' खेळाडू आल्याने नीता अंबानींची इच्छा पूर्ण

मुंबईच्या संघात 'हा' खेळाडू आल्याने नीता अंबानींची इच्छा पूर्ण

आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये मुंबईला आतापर्यंत खूप चांगली कामगिरी करता आलेली नाही. मागच्या सीजनमध्ये चॅम्पियन ठरलेली मुंबईची यंदा मात्र सुरुवात खराब झाली. संघाची कामगिरी खराब चालू असताना सुद्धा संघ मालक नीता अंबानींकडून खेळाडूची बदलाबदली होत आहे. मुंबईच्या संघात आता सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील मुंबईच्या सपोर्ट स्टाफमध्ये दिसणार आहे.नीता अंबानी यांची त्याला संघात घेण्याची खूप इच्छा होती.