Short News

अपमान झाल्याने महिला नगरसेविकेने ठोकला शिवसेनेला रामराम

अपमान झाल्याने महिला नगरसेविकेने ठोकला शिवसेनेला रामराम

महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या सभेत शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविकेकडून अपमानास्पद वागणूक मिळालेल्याने नगरसेविकेने राजीनामा दिला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नुकत्याच महापौर, उपमहापौरची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या सभेत ज्येष्ठ नगरसेविकेकडून आपल्या अपमान झाल्याचा आरोप मनिषा साईनाथ तारे यांनी केला आहे. यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. 
परीक्षा आता होणार 15 जुलैला टीईटीची  परीक्षा

परीक्षा आता होणार 15 जुलैला टीईटीची परीक्षा

वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी सीबीएसईतर्फे 8 जुलै रोजी देशभरातील विविध केंद्रांवर राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र याच दिवशी राज्यात महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) परीक्षा घेण्याचे नियोजन होते. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने परीक्षार्थी एका परीक्षेला मुकावे लागणार होते. यामुळे टीईटी ही परीक्षा 8ऐवजी 15जुलै रोजी घेतली जाणार आहे. 
भारत सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश

भारत सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश

भारत हा जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश आहे. भारताची संपत्ती 559 लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. अशिया बँक ग्लोबल वेल्थ माइग्रेशन रिव्हनुसार ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार जगातील सर्वात श्रीमंत देश हा अमेरिका आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर चीन असून चीनची संपत्ती 24,803 अब्ज डॉलर आहे. तिसऱ्या स्थानी जपान असून त्यांची संपत्ती 19,522 अब्ज डॉलर आहे. 
'भाजपने राज्यपालांचा वापर करून सत्ता बळकावणे यापुढे थांबवावे'

'भाजपने राज्यपालांचा वापर करून सत्ता बळकावणे यापुढे थांबवावे'

कर्नाटक विधानसभेतील घटना अपेक्षेनुसारच घडल्या आणि सत्ता बळकावण्याचे व्यर्थ प्रयत्न सोडून देणे भारतीय जनता पक्षाला भाग पडले. भाजपने राज्यपालांचा वापर करून सत्ता बळकावणे आता थांबवावे आणि जनादेशाचा विनम्रपणे आदर करावा, अशी खरमरीत टीका गोवा शिवसेनेच्या उपाध्यक्ष व प्रवक्या राखी प्रभुदेसाई नाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे. भाजप राज्यपालपदाचा गैरवापर करत सत्ता बळकावत असतो.