Short News

प्रभादेवीच्या ब्यूमॉन्ड इमारतीत भीषण आग

प्रभादेवीच्या ब्यूमॉन्ड इमारतीत भीषण आग

प्रभादेवी परिसरातील ब्यूमॉन्ड इमारतीला बुधवारी दुपारी आग लागली. इमारतीच्या 32 आणि 33 व्या मजल्यावर असणाऱ्या ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये ही आग लागल्याचे समजते. या इमारतीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यासह अनेक उच्चभ्रू व्यक्तींचे फ्लॅट आहेत. या घटनेची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 10गाड्या व 3वॉटर टँकर्स घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या त्यांच्याकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू.
इन्स्टाग्रामवर  करता येणार एक  तासाचा व्हिडिओ अपलोड

इन्स्टाग्रामवर करता येणार एक तासाचा व्हिडिओ अपलोड

फेसबुक आणि यूट्युबला टक्कर देण्यासाठी इन्स्टाग्रामने कंबर कसली आहे. कंपनीने एक नवीन अॅप लॉन्च केले आहे. आयजीटीव्ही अॅप (IGTV app)असे याचे नाव आहे. कंपनीने नुकतेच ते लॉन्च केले. या अॅपमुळे इन्स्टाग्रामवर तब्बल एक तासाचा व्हिडिओ अपलोड करता येऊ शकणार आहे. इन्स्टाग्राम कंपनीने सॅन फ्रान्सिस्कोमध्ये हे फीचर लॉन्च केले आहे. या फीचरविषयी अधिक माहिती व्हावी यासाठी कंपनीने आपल्या ब्लॉगवर दिली आहे. 
उस्मानाबादेत अंगावर वीज पडून दोन महिला ठार

उस्मानाबादेत अंगावर वीज पडून दोन महिला ठार

उस्मानाबाद येथील वाणेवाडी शिवारात वीज पडून दोन महिलाचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही महिला वाणेवाडी येथील रहिवासी असून शेतात काम करत होत्या. आज दुपारी काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्या जागीच ठार झाल्या. शीतल घुटकडे आणि शालिनी पवार अशी मृत महिलांची नावे आहेत. आठ दिवसानंतर आज जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. 
व्हिडिओकॉनच्या मदतीने कोचर परिवाराला मिळाले होते घर

व्हिडिओकॉनच्या मदतीने कोचर परिवाराला मिळाले होते घर

व्हिडिओकॉन इंडस्ट्रीला कर्ज दिल्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या आयसीआयसीआयच्या सीईओ आणि संचालक चंदा कोचर यांच्याविषयी आणखीन एक माहिती समोर आली आहे.व्हिडिओकॉन आणि चंदा कोचर यांचे आधीपासूनच हितसंबंध असल्याची माहिती आयकर अधिकाऱ्यांना मिळाली आहे. अधिकारी याप्रकरणाची अधिकची माहिती गोळा करत आहेत. या हितसंबंधातून त्यांनी व्हिडिओकॉनच्या मदतीने दक्षिण मुंबईतील सीसीआय चेम्बर्स अपार्टमेंट घर खरेदी केले होते. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more