Short News

उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर मराठा आरक्षण आंदोलन मागे

उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर मराठा आरक्षण आंदोलन मागे

मराठा मोर्चा आंदोलनाला जिथून सुरुवात झाली,त्या परळीतील मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आपले आंदोलन मागे घेतले आहे. गेल्या 21 दिवसांपासून हे आंदोनल सुरू होते. या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले होते. या आंदोलनानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले. तर गंगापूर येथील काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली होती. 
वेकोलीतल्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार

वेकोलीतल्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार

नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. घटना घडल्यानंतर माहिती बाहेर येऊ नये म्हणून आरोपींनी पीडित महिलेला दगडाने ठेचून मारहाण केल्याची संतापजनक कृत्यही त्यांनी केले. या घटनेने नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पीडित महिलेला नागपूरच्या आरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेला 100 कोटी अनुदान

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेला 100 कोटी अनुदान

सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकेसाठी 100 कोटींचे विशेष अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. येथील आमराई क्लबमधी नगरसेवकांच्या बैठकीत त्यांनी मोबाईल संवाद साधला. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत नूतन नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा केली. 
आमदार जयदत्त क्षीरसागर यांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण

आमदार जयदत्त क्षीरसागर यांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज आमदार जयदत्त क्षीरसागर यांना भाजपमध्ये येण्याचे जाहीर निमंत्रण मिळाले आहे. हे निमंत्रण खुद्द महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहे.  बीड शहरातील मल्टीपर्पज मैदान येथे महात्मा गांधी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.जयदत्त क्षीरसागर याच्या क्षेत्रातील कार्यक्रमास पंकजा मुंडे उपस्थित होत्या. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more