Short News

राज्य सरकार उभारणार मराठी भाषा भवन

राज्य सरकार उभारणार मराठी भाषा भवन

मुंबईत मराठी भाषा भवन उभारले जाणार आहे. या भवनाच्या उभारणीसाठी समितीची स्थापना करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय १४ तारखेला झालेल्या बैठकीत इतरही निर्णय घेण्यात आले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारीत एका चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णयही यात घेण्यात आला आहे.
हाफिज सईदला पाकिस्तान सरकारचा दणका, जमात-उद-दावाची संपत्ती जप्त

हाफिज सईदला पाकिस्तान सरकारचा दणका, जमात-उद-दावाची संपत्ती जप्त

दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तान सरकारने पुन्हा एकदा जबरदस्त दणका दिला आहे. पाकिस्तान सरकारने हाफिजच्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेची संपत्ती जप्त केली आहे. हाफिज सईदच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इनसाइनेट फाउंडेशनशी संबंधित तैराकी अकादमी, शाळा-रुग्णालय आणि रुग्णवाहिका सेवादेखील पाकिस्तान सरकारने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. . 
तासाभरातच बारावीचा पेपर फुटला, प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

तासाभरातच बारावीचा पेपर फुटला, प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

बारावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर साधरण तासाभरातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत ही प्रश्नपत्रिका आढळून आली. मात्र प्रश्नपत्रिका कुठून लीक झाली याची अद्याप माहिती नाही. तांबेवाडीच्या आश्रमशाळेत काही जणांच्या मोबाईलमध्ये ही प्रश्नपत्रिका आढळून आली. 
नोकरदारवर्गाला खूशखबर ; ईपीएफओ ८.६५% व्याजदर कायम ठेवण्याची शक्यता

नोकरदारवर्गाला खूशखबर ; ईपीएफओ ८.६५% व्याजदर कायम ठेवण्याची शक्यता

नोकदारवर्गाला आज एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना सध्याच्या आर्थिक वर्षासाठी ८.६५% व्याजदर कायम ठेवू शकते. या निर्णयामुळे ईपीएफओच्या तब्बल ५ कोटी खातेधारकांना याचा लाभ मिळणार आहे. EPFO ने या आर्थिक वर्षात आपल्या इक्विटी पोर्टफोलिओत चांगला नफा कमावला आहे. आधी व्याजदरात घट झाल्यानंतर ८.५% व्याज देण्यावर विचार सुरु होता.