Short News

16 जूनपासून दूध दर होणार कमी

16 जूनपासून दूध दर होणार कमी

दुधाचे दर प्रती लिटर मागे चार रुपयांनी कमी होणार आहेत. राज्यातलया सोळा दुध संघांनी दूधाचा दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. सोळा जून पासून नवीन दर लागु होतील.  सध्या 42 रुपये असलेला दर 38 रुपये होईल. तर, 44 रुपयांचा दर 40 रुपयांवर येईल. फक्त गाईच्या दुधासाठी ही दर कपात असणार आहे.
राज्यातील सर्वाधिक शहरे स्वच्छ - सर्वेक्षण

राज्यातील सर्वाधिक शहरे स्वच्छ - सर्वेक्षण

स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन 2018 मध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात महराष्ट्राने भरारी घेतली आहे. एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील शहरांच्या (अमृत शहरे) यादीत महाराष्ट्रामधील 28 शहरांनी शंभर क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे. तर एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत राज्यातील 58 शहरांचा समावेश आहे. या स्पर्धेत राज्याची कामगिरी गेल्या वर्षीहून सरस ठरली  आहेत. 
केरळमध्ये सापडला मेसीच्या चाहत्याचा मृतदेह

केरळमध्ये सापडला मेसीच्या चाहत्याचा मृतदेह

केरळमध्ये अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या चाहत्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. फिपा फिफा वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाच्या पराभवामुळे आणि मेसीच्या खराब कामगिरीमुळे तो निराश होता. गुरूवारी क्रोएशियाविरुद्ध अर्जेंटिनाचा 3-0 असा पराभव झाल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्यावेळी एक सुसाइड नोट सोडून बेपत्ता झाला होता.
महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक मॅनेजर निलंबित

महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक मॅनेजर निलंबित

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या दाताळा शाखेचा मॅनेजर राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. अकोला विभागीय कार्यालयानेही ही कारावई केली. बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी कारवाईसंदर्भात माहिती दिली. दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधातील हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी दिली. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more