Short News

आज राज ठाकरेंचा वाढदिवस, मनसेकडून 4 रुपयांनी पेट्रोल स्वस्त

आज राज ठाकरेंचा वाढदिवस, मनसेकडून 4 रुपयांनी पेट्रोल स्वस्त

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. 14 जून 1968 रोजी जन्मलेले राज ठाकरे वयाची पन्नाशी पूर्ण करत आहेत. वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे आज पेट्रोल 4 रुपये स्वस्त देण्यात येणार आहे. मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ही सूट देण्यात येईल. राज्यभरातील अनेक ठिकाणी ही विक्री होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली होती. 
शेगांवच्या गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना

शेगांवच्या गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना

'गण गण गणात बोते ' च्या गजरात शेगांवच्या गजानन महाराजांची पालखी आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली. महाराजांच्या पालखीचे हे ५१ वे वर्ष असून ६५० वारकरी घेऊन ही पालखी निघालीय.. ७५० किमीचा पायी प्रवास करून ६ जिल्ह्यांमधून ही पालखी जातेय .. २१ जुलैला पालखी पंढरपूरला पोहचेल., .. ६ दिवस मुक्काम करून पालखी परत शेगावला मार्गस्थ होणार आहे.
बिहारमध्ये तलावात कार कोसळून सहा मुलांचा मृत्यू

बिहारमध्ये तलावात कार कोसळून सहा मुलांचा मृत्यू

बिहारमध्ये तलावात कार कोसळून सहा मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. अररियामधील ताराबाडी येथे ही दुर्घटना घडली. कारमधून सात जण प्रवास करत असताना ताराबाडी गावाच्या बाजूला असलेल्या तलावात कार कोसळली. यामध्ये सहा मुलांचा मृत्यू झाला असून बचाव कार्यादरम्यान एका मुलाला वाचवण्यात यश आल्याचे सांगण्यात येत आहे.
अनुष्काचा ओरडा खाणारा तरुण बॉलिवूड कलाकार

अनुष्काचा ओरडा खाणारा तरुण बॉलिवूड कलाकार

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ती रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या एका तरुणाला रागावताना दिसली. विराट ने हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला. अरहान सिंह असं या तरुणाचं नाव असून नंतर त्याने सोशल मीडियातून अनुष्कालाही चांगलेच सुनावले. हा अरहान कोण हे कळाल्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. अरहान याने बालकलाकार म्हणून अनेक बॉलिवू़ड सिनेमांमध्ये काम केलं.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more