Short News

राज ठाकरेंना धक्का, शिशीर शिंदे शिवसेनेत जाणार ?

राज ठाकरेंना धक्का, शिशीर शिंदे शिवसेनेत जाणार ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक शिशीर शिंदे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिशीर शिंदेंनी गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, पुढील राजकीय वाटचालीबाबत प्रदीर्घ चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीवेळी रणनीतींपासून दूर ठेवल्याने शिशीर शिंदे पक्षावर नाराज होते.
आयर्लंडमध्ये ६० टक्के लोकांनी अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन केले

आयर्लंडमध्ये ६० टक्के लोकांनी अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन केले

आयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत ६० टक्के लोकांनी अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन केले आहे. आयर्लंड येथिल नियमानुसार अबॉर्शन हे काही विषम परिस्थितीमध्येच केले जाते. या ठिकाणी अबॉर्शनचे नियम खुप जाचक आहेत. 2013 मध्ये सविता हलप्पनवार नावाच्या भारतीय महिलाचा या कारणामुळे मृत्यू झाला होता. 
खुशखबर !!! ३० मेपर्यंत मान्सून सक्रिय होणार

खुशखबर !!! ३० मेपर्यंत मान्सून सक्रिय होणार

तापमानाचा पारा मे महिन्यात ४५ डिग्रीच्यावर पोहोचलाय. उकाड्याने हैराण झालेल्यांसाठी एक चांगली बातमी. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याआधीच पावसाला सुरुवात झालेय. तसेच याशिवाय बंगालच्या खाडीत, दक्षिण अंदमान आणि निकोबार महाद्वीपच्या काही भागात मान्सून पूर्व पाऊस सुरु झालाय. केरळ, मेघालय या भागातही पाऊस सुरु झालाय. या पावसाच्या हालचालीमुळे ४ दिवसात केरळमध्ये पाऊस पोहोचेल असा अंदाज वर्तविण्यात आलाय.
करिना कपूरचा ड्रेस पाहून भडकला सैफ अली खान !

करिना कपूरचा ड्रेस पाहून भडकला सैफ अली खान !

करिना कपूरने नुकतेच 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान घडलेला एक खास किस्सा सांगितला. करिना काळ्या रंगाच्या रिप्ड ड्रेसमध्ये आली होती. अशा ड्रेसमध्ये पाहून सैफ करिनावर भडकला आणि ताबडतोब कपडे बदलून ये असं म्हणाला. करिना कपूरने इव्हेंटमध्ये सार्‍यांनी कौतुक केलं तुलाही हा ड्रेस आवडेल असे सांगत जेव्हा फोटोमध्ये हा ड्रेस दाखवला तेव्हा त्याने या ड्रेसचं कौतुक केल्याचेही सांगितले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more