Short News

मुंबई-बोरीबंदर ते ठाणे पहिल्या रेल्वेसेवेला 165 वर्ष पूर्ण

मुंबई-बोरीबंदर ते ठाणे पहिल्या रेल्वेसेवेला 165 वर्ष पूर्ण

मुंबई बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे सेवा सुरू होऊन आज 165 वर्षे झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने राष्ट्रीय,झोनल विभागीय स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावर्षी रेल्वेच्या या विशेष दिनाचा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम हा भोपाळ येथे आयोजित केला असल्याची माहिती मध्यरेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के.जैन यांनी दिली. मागील वर्षी ठाणे रेल्वेस्थानकात हा दिवस केक कापून साजरा केला होता. 
दीपिका स्वत:च्या लग्नात घालणार 5 कोटींचा लेहेंगा

दीपिका स्वत:च्या लग्नात घालणार 5 कोटींचा लेहेंगा

अभिनेत्री दीपिका आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहेत. आता या शाही विवाह सोहळ्यासाठी दीपिका तब्बल 5 कोटींचा लेहेंगा परिधान करणार असल्याची चर्चा होत आहे. इतकेच नाहीतर दीपिकाच्या ज्वेलरीपासून ते आऊटफिट पर्यंत सगळ्याच गोष्टींची चर्चा सातत्याने रंगत आहे. दीपिकाने आपल्या लग्नासाठी आतापासूनच फेमस फॅशन डिझायनर सब्यसाचीला सुंदर लेहंगा बनवण्याची ऑर्डर दिली आहे.
कौंटी क्रिकेटमधील पदार्पणात इशांत शर्माची दमदार गोलंदाजी

कौंटी क्रिकेटमधील पदार्पणात इशांत शर्माची दमदार गोलंदाजी

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने यावर्षी कौंटी क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केले आहे. सक्सेस संघाकडून त्याने खेळताना पदार्पण केले आहे. 13 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान झालेल्या पदार्पणाच्या सामन्यात इशांतने 5 विकेट्स घेतल्या असून 69धावा दिल्या. इशांतने पहिल्या डावात 53 धावा देत 3 विकेट्स घेतल्या तर दुसऱ्या डावात 16धावा देत 2विकेट्स घेतल्या आहेत. याचबरोबर इशांतने फलंदाजी करताना 22धावाही केल्या. 
अॅमेझॉनने लॉन्च केला जलद इंटरनेट वेब ब्राउजर

अॅमेझॉनने लॉन्च केला जलद इंटरनेट वेब ब्राउजर

इंटरनेट सर्फिंगसाठी असलेल्या मोफत वेब ब्राउजर्सच्या जगात एक नवीन इंटरनेट आले आहे. ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने अॅण्ड्राईड युझर्ससाठी हे नवे वेब ब्राउजर लॉन्च केले आहे. क्रोम,युसी,ओपेरापेक्षा हे वेब ब्राउजर्स अधिक चांगले असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.कमी इंटरनेट स्पीडमध्येही हे वेब ब्राउजर चांगले काम करते. याची फाईल्स कमी क्षमतेची आहे. कंपनीने मागील महिन्यात हे वेब ब्राउजर्स लॉन्च केले होते.