Short News

थर्माकोलवरील बंदी कायम , उच्च न्यायालयाचा निकाल

थर्माकोलवरील बंदी कायम , उच्च न्यायालयाचा निकाल

उच्च न्यायालयाने थर्माकोलच्या वस्तू, मखर आणि सजावटीच्या साहित्यावरील बंदी कामय ठेवली आहे. पर्यावरणाला हानिकारक गोष्टींना परवानगी देता येणार नाही, असे म्हणत ही बंदी न्यायालयाने कामय ठेवली. राज्य सरकारने मार्चमध्ये बंदी लागू केली आहे. त्यामुळे कलाकारांचे मोठे नुकसान होत असल्याने यंदा मुभा द्यावी अशी मागणी थर्माकोल फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशन ने केली होती. 
बुराडी सामूहिक आत्महत्या : भाटीया कुटुंबियांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू

बुराडी सामूहिक आत्महत्या : भाटीया कुटुंबियांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू

देशाची राजधानी दिल्लीच्या बुराडीमध्ये ११ जणांच्या सामूहिक आत्महत्येनंतर आता कुटुंबियांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मृत्यूनंतर पाळीव कुत्रा टॉमी याला ‘हाउस ऑफ स्ट्रे एनिमल्स' (HSA) येथे ठेवण्यात आले होते. येथे त्याची देखभाल केली जात होती. मात्र, रविवारी संध्याकाळी जवळपास ७ वाजेच्या दरम्यान टॉमीचा मृत्यू झाला.
भाजप-आरएसएसकडून शिका, राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना सल्ला

भाजप-आरएसएसकडून शिका, राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना सल्ला

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेतेमंडळींना संबोधित करताना भाजपा आणि आरएसएसकडून शिकण्याचा सल्ला दिला. 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आक्रमक पद्धतीने मैदानात उतरणार असून, किमान 300 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे. भाजप आणि आरएसएसचे लोग सामान्य लोकांपर्यंत जाऊ काम करता तसे तुम्ही करा असा सल्ला त्यांनी दिला. 
आपल्याला पुढील पन्नास वर्ष राज्य करायचे आहे  - शहा

आपल्याला पुढील पन्नास वर्ष राज्य करायचे आहे - शहा

'सबका साथ सबका विकास' हा अजेंडा घेऊन समान विचारांच्या धाग्यावर भाजपची शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी आहे. मात्र तसा प्रतिसाद समोरून मिळला नाहीच तर महाराष्ट्रात वेळप्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.आपल्याला पुढील 50 वर्षे राज्य करायचे आहे,असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागवला. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more