Short News

मुंबईच्या पाणीपट्टी दरात वाढ

मुंबईच्या पाणीपट्टी दरात वाढ

मुंबईकरांचं पाणी महागलं आहे. पाणीपट्टी दरात मुंबई महापालिकेकडून 3.72 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सध्या घरगुती वापराच्या पाण्यासाठी प्रतिहजार लिटर मागे 4.91 रुपये जलआकार आहे. तो वाढून 5.09 रुपयांवर जाणार आहे. दरवर्षी जास्तीत जास्त 8 टक्क्यांपर्यंत जलआकार वाढवला जाऊ शकतो. यंदा 3.72 टक्क्यांनी पाण्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ उद्या मध्यरात्री म्हणजे 16 जूनपासून लागू होईल. 
जमावाच्या दगडफेकीत डीवायएसपींसह 7 पोलीस कर्मचारी जखमी

जमावाच्या दगडफेकीत डीवायएसपींसह 7 पोलीस कर्मचारी जखमी

कौटुंबीक वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी धुळे जिल्ह्यातील घडली. शिरपूर तालुक्यातील दुर्बळया येथे पोलीस वाद सोडविण्यासाठी गेले होते. यावेळी जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. यात पोलीस उपाधीक्षकांसह 7 पोलीस जखमी झाले आहेत. चिंतेची बाब म्हणजे जखमी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये गरोदर महिला पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश आहे.
'डॉक्टर, इंजिनिअर बनवण्याआधी विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचे धडे द्या'

'डॉक्टर, इंजिनिअर बनवण्याआधी विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचे धडे द्या'

विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवण्याआधी विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचे धडे देणे आवश्यक असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. मुलांना आयुष्यात नितीमूल्यांची जाणीव नसेल तर डॉक्टर आणि इंजिनिअर होऊनही काही उपयोग नाही असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 'पोक्सो' या कायद्याअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या खटल्यांकरता विशेष कोर्टाची स्थापना करण्यात यावी. या याचिकावर सुनावणी करता न्यायालयाने म्हटले आहे. 
सीडीआर प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अखेर बेड्या

सीडीआर प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अखेर बेड्या

सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश आले आहे. ठाणे गुन्हे शाखेने मुख्य सूत्रधार सौरव साहू याला दिल्लीतून बेड्या ठोकल्या. पोलिसांकडून आता सौरव साहूची कसून चौकशी केली जात आहे. अवैधपणे एखाद्या व्यक्तीचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स काढणे हा भारतात गुन्हा मानला जातो.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more