Short News

पालघरमध्ये नारायण राणे आणि शिवसेना आमने-सामने

पालघरमध्ये नारायण राणे आणि शिवसेना आमने-सामने

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे आणि शिवसेना यांचे वैर सर्वश्रृत आहे. याचा फायदा घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठरवले आहे. यासाठी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेविरोधात प्रचारासाठी भाजपने खासदार नारायण राणे यांना पाचारण केले. राणेंना प्रचार करण्याची विनंती चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत राणेही प्रचाराला जाणार असल्याचे कळत आहे. 
शाओमी रेडमी नोट 4 च्या किमतीत मोठी सूट

शाओमी रेडमी नोट 4 च्या किमतीत मोठी सूट

कमी किंमतीत अत्यंत उपयोगी स्मार्टफोन विकत घेण्याची संधी शाओमी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. शाओमी रेडमी नोट 4 वर सूट मिळत आहे. याबद्दल माहिती शाओमी इंडियाचे प्रमुख आणि शाओमीचे उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. या फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरियंटचा स्मार्टफोन 11,999 रुपयांत खरेदी करू शकतात. लॉन्चिंगवेळी या स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये होती.
भाजपकडून माझ्या पतीच्या फोटोंचा गैरवापर, जयश्री वनगा

भाजपकडून माझ्या पतीच्या फोटोंचा गैरवापर, जयश्री वनगा

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या फोटो आणि नावाचा भाजपकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप जयश्री वनगा यांनी केला असून भाजपविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
अन् पालकमंत्र्यांनी आमदारांना ठोकला सलाम

अन् पालकमंत्र्यांनी आमदारांना ठोकला सलाम

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट पुन्हा एकदा आपल्या गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. पिंपरी-चिंचवड येथील आयुक्तालयात आले असता त्यांनी चक्क दोन आमदारांना सलाम ठोकला. त्यांच्या या कृतीमुळे आमदारांसह पोलीस अंचबित झाले. गिरीश बापट हे पिंपरी चिंचवड शहरातील स्वतंत्र आयुक्तालया संदर्भाच्या बैठकीला बापट आले शहरात आले होते. यावेळी त्यांनी बैठकस्थळी येताच आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना सलाम ठोकला.