Short News

पुढच्या वर्षात साखर उद्योगा समोर मोठे संकट - शरद पवार

पुढच्या वर्षात साखर उद्योगा समोर मोठे संकट - शरद पवार

प्रत्येक क्षेत्रात संकटे ही येत असतात. साखर उद्योगावर पुढील वर्षी मोठे संकट उभे राहणार आहे. प्रचंड प्रमाणात ऊसाचे उत्पादन झाले आहे. मात्र जागतिक बाजारपेठच मंदावली आहे. त्यामुळे पुढील वर्षी साखरेला 2500 रुपयांपर्यंतच दर मिळणार असल्याचे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तवले आहे. सरकारने ठरवून दिलेला ऊसाचा दर देणेही कारखान्यांना शक्य होणार नसल्याचे पवारांनी म्हटले आहे.
लोकलसमोर ढकलून 56 वर्षीय प्रवाशाची हत्या

लोकलसमोर ढकलून 56 वर्षीय प्रवाशाची हत्या

किरकोळ वादातून एका प्रवाशाला धावत्या लोकलसमोर ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईत मध्य रेल्वेवरील मुलुंड स्टेशनवर ही घटना घडली. दीपक चमन पटवा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दीपक पटवा हे मुलुंड पश्चिमेला राहत होते. दीपक शनिवारी दुपारी मुलुंड स्टेशनच्या फलाट क्रमांक 3 वरुन प्रवास करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एक महिला आणि पुरुषासोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली होती. 
पुण्यातील आयपीएलचे प्लेऑफ सामने हलवण्याची चिन्हे

पुण्यातील आयपीएलचे प्लेऑफ सामने हलवण्याची चिन्हे

चेन्नईत कावेरी पाणीवाटपाला होत असलेल्या विरोधामुळे चेन्नईला पुण्याचे गहुंजे स्टेडिअम होम ग्राऊंड म्हणून देण्यात आले. परंतु आता परत चेन्नईला आपले बस्तान हलवावे लागण्याची शक्यता आहे. सध्या चेन्नईचे सामने पुण्यात रंगले आहेत. पण आता हा आनंद जास्त काळ टिकण्याची शक्यता नाही. 23 आणि 25 मे ला होणारे प्लेऑफ सामने इतर ठिकाणी हलविण्याची तयारी सुरू आहे. लखनौ येथे हे सामने खेळवले जाऊ शकतात. 
सेक्स ट्रिपला जाणाऱ्या व्यक्तीला 330 वर्ष कारावास

सेक्स ट्रिपला जाणाऱ्या व्यक्तीला 330 वर्ष कारावास

चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली फ्लोरिडामधील एका व्यक्तीला 330 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी सेक्स ट्रिपसाठी फिलिपिन्सला जात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. फिलिपिन्सच्या दौ-यावर गेल्यानंतर आरोपी लहान मुलांसोबत लैंगिक अत्याचार करत त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर करत असे अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. डेव्हिड लिंच असे या आरोपीचे नाव आहे.