Short News

अवांतर वाचनासाठी घेतलेल्या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर

अवांतर वाचनासाठी घेतलेल्या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर

शालेय विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी निवड करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत विखे पाटलांनी या पुस्तकांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.या पुस्तकांमध्ये कौमार्यभग्न,पुत्र संतती,इंद्रियसुख असे आक्षेपार्ह शब्द असल्याचे विखे-पाटील म्हणाले.
मालदीवमधील आणीबाणीला मुदतवाढ द्या - राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन

मालदीवमधील आणीबाणीला मुदतवाढ द्या - राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन

मालदीवचे राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी देशात लागू असलेल्या आणीबाणीला १५ दिवसांची वाढीव मुदत मिळावी, अशी आज संसदेला विनंती केली आहे. देशात राजकीय अराजक असल्यामुळे ही मुदत वाढावी, असे अब्दुल्ला यामीन यांनी म्हटले आहे. मालदीवच्या संसदेमध्ये बोलाविण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या विनंतीवर चर्चा करण्यात आली. 
शेअर बाजार गडगला;  सेन्सेक्स २३६ अंकांनी तर निफ्टी ७४ अंकांनी घसरला

शेअर बाजार गडगला; सेन्सेक्स २३६ अंकांनी तर निफ्टी ७४ अंकांनी घसरला

 सोमवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २३६ अंकांनी घटत ३३, ७७४ वर आला. तर निफ्टी ७४ अंकांनी उतरत १०,३७८ वर व्यवहार बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये मिडकॅपमध्ये १.०७ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅपमध्ये १.४२ टक्यांनी घट झालेली दिसली. बीएसईमधील सर्व १९ सेक्टरच्या शेअर्स घसरण झालेली दिसली.
नीरव मोदीला त्याच्या पापाची शिक्षा होईल ; रामदेव बाबांनी दिला शाप

नीरव मोदीला त्याच्या पापाची शिक्षा होईल ; रामदेव बाबांनी दिला शाप

मी फक्त एकाच मोदीला ओळखतो, ते म्हणजे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त जे पण मोदी आहेत जे, घोटाळे करतात त्यांच्यामुळे देशाचे नाव खराब होते. नीरव मोदीला त्याच्या पापाचे फळ मिळेल. मोदी सरकार त्याला त्याच्या योग्य जागी पाठवेल, असा विश्वास योग गुरु रामदेव बाबांनी व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यातील मुलमध्ये योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी रामदेव बाबा आले होते.