मोहोळ येथे दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक नागरिक ठार, तीन पोलीस जखमी
महाराष्ट्र
- 2 month, 6 days ago
मंगळवेढा तालुक्यातील घडलेल्या खून आणि दरोड्यातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर चोरट्यांनी चाकू हल्ला केला.यात पोलीस दलातील गुन्हे शाखेचे ३ पोलीस जखमी झाले आहेत. तर एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. अबु कुरेशी,असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हे आरोपी मोहोळ येथे येणार असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस दलाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी साफळा रचून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.