Short News

गगनबावड्यात दोन एसटी बसची धडक; वृद्ध महिला ठार, 20 प्रवासी जखमी

गगनबावड्यात दोन एसटी बसची धडक; वृद्ध महिला ठार, 20 प्रवासी जखमी

गगनबावडा तालुक्यात दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात अपघात झाला. या अपघातात एक वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास गगनबावडा तालुक्यातील लोंघे गावाजवळ ही दुर्घटना घडली. अपघातातील जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
फिटनेस फंडा,  जडेजाचा तोडू लागला टायर

फिटनेस फंडा, जडेजाचा तोडू लागला टायर

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा एका मोठ्या हातोड्याने ट्रकचा टायर फोडण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला ही गोष्ट खरी वाटणार नाही. ही गोष्ट दस्तुरखुद्द जडेजानेच निदर्शनास आणून दिली आहे. भारताचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर झाला आहे. या संघात जडेजाला स्थान देण्यात आले आहे. कसोटी सामन्यांमध्ये आपल्याकडून चांगली कामगिरी व्हावी, यासाठी जडेजाने नवीन फिटनेस मंत्र शोधून काढला आहे. 
'जावई'गिरीवरून  सभागृहात गोंधळ; विरोधकांकडून जोरदार चिखलफेक

'जावई'गिरीवरून सभागृहात गोंधळ; विरोधकांकडून जोरदार चिखलफेक

रामदेवबाबांच्या पतंजली उद्योग समूहाला मिहानमध्ये 230 कोटी रुपये किमतीची जमीन दिली. त्यामुळे 209 कोटींचे नुकसान झाले. रामदेवबाबा सरकारचे जावई आहेत काय, असा सवाल संजय दत्त यांनी प्रश्नोत्तरांच्या तासानंतर केला. "त्यावर बाबा रामदेव जावई नाहीत. रॉबर्ट वढेरा मात्र जावई आहेत' असे प्रत्युत्तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. यावरून विरोधी बाकांवरील सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. 
बुलेट ट्रेनमुळे आदिवासी भूमिहीन होणार नाहीत : मुख्यमंत्री

बुलेट ट्रेनमुळे आदिवासी भूमिहीन होणार नाहीत : मुख्यमंत्री

वेगवान दळणवळणाच्या माध्यमातून मागास भागात विकासाची दालने खुली होण्यासाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महत्वाचा आहे, असे सांगत या प्रकल्पामुळे आदिवासी शेतकरी भूमिहीन होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.हा प्रकल्प शेतकऱ्यांचं नुकसान करणारा असून तो रद्द करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना काँग्रेसचे संजय दत्त यांनी मांडली होती. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more