Short News

भारतीय सागरी हद्दीत घुसखोरी, बोटीसह ७ पाकिस्तानी ताब्यात

भारतीय सागरी हद्दीत घुसखोरी, बोटीसह ७ पाकिस्तानी ताब्यात

भारत-पाक आंतराष्ट्रीय सागरीसीमा हद्द ओलांडून आलेल्या अल-हिलाल या पाकिस्तानी बोटीला भारतीय तटरक्षक दलाच्या पेट्रोलिंग जहाजाने आपल्या ताब्यात घेतले आहे. ही बोट भारतीय सागरी हद्दीत अनधिकृतपणे मासेमारी करताना आज ही कारवाई करण्यात आली. अल- हिलाल या मासेमारी करणाऱ्या बोटीवर असलेल्या ७ जणांना सागरी सीमा सुरक्षा (कोस्ट-गार्ड)ने अटक केली आहे.
डायना 'मिस वर्ल्ड' कशी? विप्लव देव यांना पडला प्रश्न

डायना 'मिस वर्ल्ड' कशी? विप्लव देव यांना पडला प्रश्न

भारतात महाभारताच्या काळातही इंटरनेटचा वापर केला जात होता, असं वक्तव्य करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी विप्लव कुमार यांनी सौंदर्य स्पर्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.‘मिस वर्ल्ड' अर्थात विश्वसुंदरी डायना हेडनचा निकाल ‘फिक्स' होता, ती किताबास पात्र होती का? असा सवाल विप्लव देव यांनी उपस्थित केला. 
'राज्यसभेची जागा गेल्यावरच रेणुका यांना ‘कास्टिंग काऊचचा सिनेमा दिसला'

'राज्यसभेची जागा गेल्यावरच रेणुका यांना ‘कास्टिंग काऊचचा सिनेमा दिसला'

सिने उद्योगातच नाही,तर राजकारणातील स्त्रीयांनाही ‘कास्टिंग काऊच'चे शिकार व्हावे लागते. असे विधान रेणुका चौधरी यांनी केले होते. त्यावर राज्यसभेची जागा सोडावी लागल्यावरच त्यांना संसदेतील ‘कास्टिंग काऊच'चा सिनेमा का दिसला? असा सवाल शिवसेनेने 'सामना'मधून केला आहे. रेणुकांचे हे विधान बेजबाबदारपणाचे आणि समस्त महिलावर्गाचा अपमान करणारे असल्याची टीकाही शिवसेनेने केली. 
बाळाच्या जन्मानंतर 1 मिनिट 48 सेकंदात मिळाले  'आधार'कार्ड

बाळाच्या जन्मानंतर 1 मिनिट 48 सेकंदात मिळाले 'आधार'कार्ड

बुलडाण्यातील एका नवजात मुलीला अवघ्या पावणे दोन मिनिटात आधार कार्ड मिळाले आहे. आधार नोंदणीचा हा अनोखा विक्रम खामगावातल्या अग्रवाल कुटुंबीयांनी आणि आधार नोंदणी अधिकाऱ्यांनी केला. खामगावातील जलंब रोडवर एका खाजगी रुग्णालयात पहाटे शिल्पा अग्रवाल दाखल झाल्या होत्या. त्यांनी 18 एप्रिलला सकाळी आठ वाजता मुलीला जन्म दिला. बाळाचे वडील आकाश अग्रवाल यांनी लगेचच लेकीची आधार कार्डसाठी नोंदणी केली.