Short News

व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये 'अॅड' करुन मुलीला त्रास देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये 'अॅड' करुन मुलीला त्रास देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

अमरावती शहरात दुसऱ्याच्या परवानगी शिवाय व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये अॅड चांगलेच महागात पडले आहे. शहरातील एका मोबाईलधारकाने व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला. यात एका मुलीची परवानगी न घेता ग्रुपमध्ये अॅड केले.  परंतु ग्रुपमध्ये अॅड केल्यानंतर त्याने तिला व्हिडिओ कॉल करुन त्रास देऊ लागला. याबाबतची तक्रार तरुणीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अॅडमीनविरुद्ध विनयभंग तसेच बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला.
वयाच्या ३६व्या वर्षी रॉजर फेडरर ठरला जगातील क्रमांक एकचा खेळाडू

वयाच्या ३६व्या वर्षी रॉजर फेडरर ठरला जगातील क्रमांक एकचा खेळाडू

स्वित्झरलॅंडचा आंतरराष्ट्रीय टेनिसपटू रॉजर फेडररने यंदाचा पहिल्या ग्रॅंड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बाजी मारली. या कामगिरीमुळे तो जगातील क्रमांक एकचा खेळाडू ठरला आहे. तसेच, जगातील सर्वाधीक वयस्कर टेनिसपटू ठरण्याचा मानही त्याला मिळाला आहे. ३६ वर्षीय फेडररने रोटरडम ओपनच्या क्वार्टरफायनलमध्ये हॉलंडच्या रॉबिन हासेला ४-६, ६-१, ६-१ अशा फरकाने पराभूत केले.
हायपरलूपने मुंबई पुण्याचे अंतर होणार कमी

हायपरलूपने मुंबई पुण्याचे अंतर होणार कमी

जगातील पहिली हायपरलूप मुंबई ते पुणेदरम्यान धावणार आहे. तसे झाल्यास दोन्ही शहरांतील १५० किमीचे अंतर फक्त १४ ते २५ मिनिटांत कापले जाणार आहे. सध्या हे अंतर गाठण्यासाठी तीन तास लागतात. रविवारी व्हर्जिन ग्रुप आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुंबई-पुणे हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टिमला जोडण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. 
‘माझ्या बायकोचा प्रियकर’चा टीझर प्रदर्शित

‘माझ्या बायकोचा प्रियकर’चा टीझर प्रदर्शित

अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव आणि भाग्यश्री मोटे यांची मुख्य भूमिका असलेला माझ्या बायकोचा प्रियकर सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये तीनही व्यक्तिरेखांची छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. राजीव एस रूईया दिग्दर्शित आणि राजकला मूवीज व बाबा मोशन पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.