Short News

उसाच्या हफ्त्यासाठी खा. राजू शेट्टींचे शरद पवारांना साकडे

उसाच्या हफ्त्यासाठी खा. राजू शेट्टींचे शरद पवारांना साकडे

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरत. परंतु आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेलाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तोंडाकडे पाहावे लागत आहे. कारखानदारांकडून शेतकऱ्यांच्या ऊसाचा हप्ता काही मिळालेला नाही. सत्तेतील राज्यकर्ते देखील आमचे काही ऐकत नाहीत. यामुळे शरद पवारांनी शेतकऱ्यांचा हफ्ता मिळवून द्यावा, असे राजू शेट्टी म्हणाले. 
आंतरराष्ट्रीय क्रिकेट टी२० शिवाय पुढे जाऊ शकत नाही - गांगुली

आंतरराष्ट्रीय क्रिकेट टी२० शिवाय पुढे जाऊ शकत नाही - गांगुली

क्रिकेटविश्वात टी-२० ला सध्याच्या घडीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. टी-२० मुळे क्रिकेट हा खेळ अधिकच प्रसिद्ध झाला असून, प्रेक्षकही खूप मोठ्या संख्येने या खेळाचा आनंद घेताना दिसतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता टी-२० शिवाय पुढे जाऊ शकत नाही, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले. युवा खेळाडूंची कामगिरी खूपच प्रभावी होत असल्याचे गांगुली म्हणाला. 
'झिरो' ठरला श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट

'झिरो' ठरला श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट

बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले. वयाच्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या श्रीदेवी यांनी गेल्याच वर्षी चित्रपट कारकीर्दीचा सुवर्ण महोत्सव पूर्ण केला. शाहरुख खानच्या आगामी 'झिरो' चित्रपटात श्रीदेवींचे अखेरचे दर्शन होणार आहे. मॉम हा श्रीदेवी यांच्या कारकीर्दीतला ३०० वा सिनेमा होता. झिरो सिनेमा हा ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 
केपटाऊन विजय:  रैना सामनावीर तर भुवनेश्वर ठरला मालिकावीर

केपटाऊन विजय: रैना सामनावीर तर भुवनेश्वर ठरला मालिकावीर

केपटाऊनच्या ट्वेन्टी२० सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी रोमांचक विजय मिळवला. भारताने या विजयासह तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. भुवनेश्वरने चार षटकांत केवळ २४ धावा देऊन २ फलंदाजांना माघारी धाडले. या संपूर्ण मालिकेत भुवनेश्वराच्या कामिगीरीमुळे त्याला मालिकावीर घोषित केले. तर ४३ धावांची दमदार खेळी करणाऱ्या सुरेश रैनाला सामनावीर घोषित करण्यात आले.