Short News

राज्यपाल काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही - संजय राऊत

राज्यपाल काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही - संजय राऊत

कर्नाटकमधील त्रिशंकू परिस्थितीमुळे आता सत्ता स्थापनेचा निर्णय राज्यपाल वजुबाई वाला यांच्या हातात आहे. राज्यपाल वजुबाई वाला सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती सोपवणार, याकडे सर्वांचच लक्ष लागले आहे. दरम्यान राज्यपाल पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. राज्यपाल काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ देतील असे वाटत नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
टी20 लीग : मुंबईचा 11 धावांनी दणदणीत पराभव

टी20 लीग : मुंबईचा 11 धावांनी दणदणीत पराभव

मुंबईसाठी महत्त्वाचा असलेल्या सामन्यात हिट मॅनचा संघाचा दणदणीत पराभव झाला. या पराभवासह मुंबईच्या बाद फेरीत जाण्याची संधीही मुंबईने गमावली आहे. दिल्लीने दिलेल्या पराभवाचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाच्या नाकीनऊ लागले. दिल्लीच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबईचे नामी फलंदाजींनी नांगी टाकली. मुंबईचा पूर्ण संघ 163 धावांवर गारद झाला. कर्णधार रोहित शर्माही या सामन्यातही निराशाजनक फलंदाजी केली. 
तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या 3 मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मच्छिन्नद्रनाथ चिंचोली गावात ही दुर्घटना घडली. सोमित्रा सातपुते (वय 12 वर्षे), संगीता रणमळे (वय 15 वर्षे) आणि जना रणमळे (वय 18 वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत. 6 मुली आज सकाळच्या सुमारास गावच्या परिसरातील तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. 
शाओमी रेडमी नोट 4 च्या किमतीत मोठी सूट

शाओमी रेडमी नोट 4 च्या किमतीत मोठी सूट

कमी किंमतीत अत्यंत उपयोगी स्मार्टफोन विकत घेण्याची संधी शाओमी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. शाओमी रेडमी नोट 4 वर सूट मिळत आहे. याबद्दल माहिती शाओमी इंडियाचे प्रमुख आणि शाओमीचे उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. या फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरियंटचा स्मार्टफोन 11,999 रुपयांत खरेदी करू शकतात. लॉन्चिंगवेळी या स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये होती.