Short News

अथर्व शिंदे मृत्यू प्रकरण : पार्टीत अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा

अथर्व शिंदे मृत्यू प्रकरण : पार्टीत अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा

पोलीस निरिक्षक नरेंद्र शिंदे यांचा मुलगा अथर्व याच्या मृत्यूचे गूढ अद्याप उकलले नसले तरी पोलिसांनी याप्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल केला. आरे वसाहतीमधील बंगल्यात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत अमली पदार्थाचे सेवन केल्यामुळे आठ जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अथर्व याच्या मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त आरे वसाहतीमधील बंगल्यात ७ मे रोजी पार्टी आयोजित करण्यात आली होती.
आपल्याला पुढील पन्नास वर्ष राज्य करायचे आहे  - शहा

आपल्याला पुढील पन्नास वर्ष राज्य करायचे आहे - शहा

'सबका साथ सबका विकास' हा अजेंडा घेऊन समान विचारांच्या धाग्यावर भाजपची शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी आहे. मात्र तसा प्रतिसाद समोरून मिळला नाहीच तर महाराष्ट्रात वेळप्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.आपल्याला पुढील 50 वर्षे राज्य करायचे आहे,असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागवला. 
बिग बीने शेअर केला रणबीरसोबतचा फोटो

बिग बीने शेअर केला रणबीरसोबतचा फोटो

'ब्रम्हास्त्रा' या आगामी चित्रपटातून अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूर एकत्र झळकणार आहेत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे कलाकार अनेकदा मस्ती करताना दिसत असतात. असाच एक रणबीरसोबतचा फोटो बच्चन यांनी नुकताच शेअर केला आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हे कलाकार सध्या न्यूयॉर्कमध्ये असून करण जोहर या चित्रपटाचे निर्माते आहेत.
गुजरात विद्यापीठातील कुणाल काम्राचा कॉमेडी शो रद्द

गुजरात विद्यापीठातील कुणाल काम्राचा कॉमेडी शो रद्द

स्टँडअप कॉमेडी विश्वातील एक प्रसिद्ध कॉमेडियने म्हणजे कुणाल काम्रा. कुणाल सध्या अडचणीत आला आहे. वडोदऱ्यातील एम.एस. विद्यापीठात कुणाल काम्राच्या कॉमेडी शोचे आयोजन करण्यात आले होते. पण तो शो रद्द करण्यात आला आहे. 11ऑगस्टला सी.सी. मेहता सभागृहाध्ये हा कार्यक्रम होणार होता. कार्यक्रमातील काही भाग हा देशद्रोही असल्याचे सांगण्यात आल्यानंतर विद्यापीठाने हा निर्णय घेतला. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more