Short News

शिवजयंती तिथीप्रमाणेच साजरी व्हावी -  राज ठाकरे

शिवजयंती तिथीप्रमाणेच साजरी व्हावी - राज ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराज ही आपली ओळख आहे. त्यांची जयंती 365 दिवस साजरी व्हावी. महाराजांची जयंती केवळ उत्सव नव्हे तर सण आहे. जर आपण सण तिथीप्रमाणे साजरे करतो, तर महाराजांची जयंती तारखेप्रमाणे का? ती तिथीप्रमाणेच साजरी व्हावी, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ते रायगडमध्ये बोलत होते. रायगड जिल्ह्यातील शिवप्रेमींनी महाड येथे राज ठाकरे यांची भेट घेऊन शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आमंत्रण दिले.
'देसी गर्ल' प्रियांकाच्या या शाही ड्रेसवर जेटली नाराज

'देसी गर्ल' प्रियांकाच्या या शाही ड्रेसवर जेटली नाराज

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचे रॉयल वेडिंग नुकताच पार पडले. प्रियांका आणि मेगन या एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रीणी असून, आपल्या मैत्रीणाला शुभेच्छा देण्यासाठी ही ‘देसी गर्ल' शाही विवाह सोहळ्याला पोहोचली. समता पार्टीच्या माजी अध्यक्षा जया जेटली यांना प्रियांका चोप्राचा ड्रेस काही खास पसंत पडला नाही. ती भारताच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणे सोडून ब्रिटिश अरिस्टोक्रेट ड्रेसमध्ये दिसली.
कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबीयांनाही क्लीन चीट

कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबीयांनाही क्लीन चीट

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सरकारी नामुष्कीने दोषमुक्त ठरलेले काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबीयांनाही लाचलुचप्रतिबंधक न्यायालयातून मंगळवारी दिलासा मिळाला. कृपाशंकर सिंह यांची पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्र मोहन, मुलगी सुनिता, जावई विजय सिंह आणि सून अंकिता या सर्वांना मंगळवारी न्यायालयाने क्लीन चीट दिली. या खटल्यात कृपाशंकर सिंह यांना दोषमुक्त करण्यात आले होते.
तापसीच्या 'मुल्क' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

तापसीच्या 'मुल्क' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

बॉलिवुडची 'पिंक गर्ल' तापसी पन्नूचा आगामी 'मुल्क' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला असून, यामध्ये तापसी पुन्हा एकदा कोर्टात पाहायला मिळत आहे. या फर्स्ट लूकमध्ये ती एका वकीलाच्या वेशात दिसत आहे. तापसीने तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर हा फर्स्ट लूक शेअर केला.