Short News

बाळाच्या स्पर्म डोनरचं नाव जाहीर करण्याची सक्ती नको

बाळाच्या स्पर्म डोनरचं नाव जाहीर करण्याची सक्ती नको

'टेस्ट ट्युब बेबी' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जन्म झालेल्या एका बाळाच्या 'सिंगल पॅरेन्ट' असलेल्या आईला या बाळाचा जन्माचा दाखला मिळवण्यासाठी कोर्टात धाव घ्यावी लागलीय. नालासोपारा इथं राहणाऱ्या एका ३१ वर्षीय महिलेनं आपल्या बाळाला त्याच्या वडिलांच्या (स्पर्म डोनर) नावाशिवाय महानगरपालिकेकडून जन्माचा दाखला मिळवा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय.
'खली बली' आता 'गंगनम' स्टाइलमध्ये

'खली बली' आता 'गंगनम' स्टाइलमध्ये

पद्मावत' चित्रपटातील 'खली बली' हे गाणंही असंच सोशल मीडियावर नवनवीन वर्जन्ससह हिट ठरतंय. रणवीर सिंगवर चित्रित केल्या गेलेल्या या गाण्यात त्याने अप्रतिम ऊर्जा दाखविल्यानं हे मूळ गाणं प्रेक्षकांना चांगलंच भावलं. आता या गाण्याच्या वर्जन्सनींही प्रेक्षकांना भुरळ घातलीय. सोशल मीडियावर 'खली बली'च्या नवनवीन वर्जन्समध्ये सर्वाधिक हिट ठरतंय ते त्याचं 'गंगनम' स्टाइल वर्जन.
जर्मनीत गुंजली कुछ कुछ होता है ची धून

जर्मनीत गुंजली कुछ कुछ होता है ची धून

द स्टटरागार्ट चेंबर या जर्मन ऑर्केस्ट्राने (वाद्यवृंदाने) ‘तुम पास आए... यू मुस्कुराए' या गाण्यावर सुंदर सादरीकरण करत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच दिला. या गाण्याची धुन अनोख्या आणि तितक्याच प्रभावी पद्धतीने सादर करणाऱ्या या वाद्यवृंदाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही फारच कमी वेळात व्हायरल झाला आणि करण जोहरपर्यंतही पोहोचला.
आशिक बनाया आपने गाण्यावरील या मुलीचा डान्स पहाच...
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/gepf8kjRXgA" frameborder="0" allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen></iframe>

आशिक बनाया आपने गाण्यावरील या मुलीचा डान्स पहाच...

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रोतेला आणि करण वाहीच्या हेट स्टोरी 4 चे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. अलिकडेच त्याचे पहिले गाणे आशिक बनाया आपने देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. आता या गाण्यावर डान्स करतानाचा एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा तरूणाईला चांगलाच भावला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सोनाली असे या मुलीचे नाव आहे.