राज्य सरकारकडून उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ
महाराष्ट्र
- 11 days ago
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत महाराष्ट्र सरकारने अचानक वाढ केली आहे. राज्य गुप्तचर विभागाचा सुरक्षेबाबतच्या अहवालानंतर गृह विभागाने सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सुरक्षा झेडवरुन झेड प्लस करण्यात आली आहे तर आदित्य ठाकरेंची सुरक्षा एक्सवरुन वाय प्लस करण्यात आली आहे.