Short News

बाहेरचे पदार्थ मल्टिप्लेक्समध्ये नेता येणार- राज्य सरकार

बाहेरचे पदार्थ मल्टिप्लेक्समध्ये नेता येणार- राज्य सरकार

मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला जाणाऱ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे पदार्थ नेणाऱ्यांना कोणीही अडवू शकत नाही, तसा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे यापुढे मल्टिप्लेक्समधील महागडे पदार्थ घेण्याची गरज भासणार नाही. बाहेरुन घेतलेले पदार्थदेखील मल्टिप्लेक्समध्ये नेता येतील.
सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र 'ब्रह्मोस'चे यशस्वी प्रक्षेपण

सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र 'ब्रह्मोस'चे यशस्वी प्रक्षेपण

भारताचे सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र 'ब्रह्मोस'चे आज (सोमवार) ओडिशाच्या बालासोर किनारपट्टीवरील परीक्षण केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ही चाचणी सकाळी साडे दहा वाजता करण्यात आली. सर्व मानकांवर मिसाइलची चाचणी यशस्वी ठरली. याच वर्षी मे महिन्यातही मिसाइलचे परीक्षण करण्यात आले होते. त्यावेळी डीआरडीओने ब्रह्मोस मिसाइलचे आयुष्य १० ते १५ वर्षे वाढविल्यानंतर चाचणी घेतली होती.
रमेश पोवारची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

रमेश पोवारची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू रमेश पोवार याची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक तुषार अरोठे यांनी राजीनामा दिल्यानंतर रमेश पोवारची अंतरिम प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. खेळाडूंसोबत असलेल्या मतभेदामुळे तुषार अरोठे यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. 
'सेक्रेड गेम्स'च्या नवीन भागांवर न्यायालयाची बंदी

'सेक्रेड गेम्स'च्या नवीन भागांवर न्यायालयाची बंदी

विक्रम मोटवानी आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित 'सेक्रेड गेम्स' ही वेब सीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेब सीरिजविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी झाली असून वेब सीरिजचे कोणतेही नवीन भाग प्रदर्शित करु नयेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more