Short News

राज्यातील गरिबांना मधुमेह, हृदयरोग, कर्करोगाची औषधे मोफत मिळणार

राज्यातील गरिबांना मधुमेह, हृदयरोग, कर्करोगाची औषधे मोफत मिळणार

मधुमेह, हृदयरोग व कर्करोगाच्या औषधांवरचा जीएसटी करण्यात येणार आहे. हा कर 12 टक्क्यावरुव 5 टक्के वर आणण्याचा प्रस्ताव महाराष्ट्राने जीएसटी परिषदेला दिला आहे. त्याचा पाठपुरावा सरकार करत आहे. जीएसटी कमी होण्यापूर्वी ही औषधे गरीब रुग्णांना मोफत मिळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 
अमेरिकेत करोडो डॉलर्सचा घोटाळा, २० भारतीयांना कारावासाची शिक्षा

अमेरिकेत करोडो डॉलर्सचा घोटाळा, २० भारतीयांना कारावासाची शिक्षा

अमेरिकेत करोडो डॉलर्सच्या कॉल सेंटर घोटाळ्यात सहभागी असलेल्या भारतीय वंशाच्या २० जणांना २० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारतात स्थित असलेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून हजारो अमेरिकन नागरिकांना करोडो डॉलर्सचा गंडा घालण्यात आला होता. या आठवड्यात ज्या २१ जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे त्यांना चार ते २० वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
गळाभेट घेऊन विष दिले जाते, मोदींनी वैद्यकीय चाचणी करावी - सुब्रमण्यम स्वामी

गळाभेट घेऊन विष दिले जाते, मोदींनी वैद्यकीय चाचणी करावी - सुब्रमण्यम स्वामी

अविश्वास प्रस्तावावेळी बोलताना संसदेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. यावरुन, भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या गळाभेटीवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, रशिया आणि उत्तर कोरियामध्ये अशा प्रकरे गळाभेट घेऊन विष दिले जाते. मोदीजींनीही राहुल गांधी यांनी दिलेल्या गळाभेटीनंतर आपली वैद्यकीय चाचणी करुन घ्यायला हवी.
शंभरच्या नव्या नोटेसाठी होणार एटीएमचे रिकॅलिब्रेशन, येणार १०० कोटींचा खर्च

शंभरच्या नव्या नोटेसाठी होणार एटीएमचे रिकॅलिब्रेशन, येणार १०० कोटींचा खर्च

शंभर रुपये मुल्याची नवी नोट चलनात आणण्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी जाहीर केले. परंतु ही नवी नोट जु्न्या नोटेपेक्षा आकाराने वेगळी आहे. यामुळे नोटाबंदीच्या वेळी जसे एटीएमचे रिकॅलिब्रेट करण्यात आले, तसे यावेळीही करावे लागणार आहे. यासाठी लाखो एटीएम रिकॅलिब्रेट करण्यासाठी १०० कोटींचा खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more