Short News

शिक्षिकेने कानशिलात लगावल्याने विद्यार्थ्याने गमावला कान

शिक्षिकेने कानशिलात लगावल्याने विद्यार्थ्याने गमावला कान

शिक्षिकेने कानशिलात लगावल्यामुळे आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटल्याचा प्रकार समोर आला आहे. नालासोपाऱ्यातील शाळेत हा प्रकार घडला असून शिक्षिकाला अटक झाली होती. दरम्यान शिक्षिकेची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. इतिहासाचे पुस्तक न आणल्यामुळे वर्गाबाहेर काढलेल्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लागवली होती. त्यावेळी विद्यार्थ्याच्या कानातून रक्त आले असे विद्यार्थ्याच्या आईने सांगितले.
बहुदेशीय प्रणालीच्या फेररचनेसाठी फ्रान्सची अमेरिकेला हाक

बहुदेशीय प्रणालीच्या फेररचनेसाठी फ्रान्सची अमेरिकेला हाक

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी बहुदेशीय व्यापाराची पुर्नरचना करण्यासाठी अमेरिकेला मदतीचे आवाहन केले. बहुदेशीय व्यापार ही संकल्पना निर्माण करण्यात अमेरिकेची निर्णायक भूमिका राहिलेली आहे, असे ते म्हणाले. युएस काँग्रेसच्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. 'बहुदेशीय व्यापार' या संकल्पनेला प्रत्यक्षात अमेरिकेने आकार दिल्याचे ते म्हणाले. 
सुरक्षा दलाच्या जवानांकडून मुफ्ती यासिरला कंठस्नान

सुरक्षा दलाच्या जवानांकडून मुफ्ती यासिरला कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुफ्ती यासिर याला कंठस्नान घालण्यात आले आहे. पोलीस महासंचालक एसपी वैद यांनी आपल्या ट्वीटरवरुन ही माहिती दिली आहे. 'यासिर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसहूद अझहर याचा उजवा हात मानला जायचा.  
दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन पहिले नेते

दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन पहिले नेते

उद्या आशिया आणि पर्यायाने जागतिक शांततेच्या दिशेने नवे पाऊल टाकणार आहे. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांची अणूकार्यक्रमासह इतर अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. 1953 नंतर उत्तर कोरियाची सीमा ओलांडून दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन हे पहिले उ.कोरियन नेते असतील. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन आणि  किम यांची सकाळी स्थानिकवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता भेट होणार आहे.