Short News

ठाण्यातील कॉल सेंटर प्रकरण : व्यवस्थापकाची होती २० टक्क्यांची भागीदारी

ठाण्यातील कॉल सेंटर प्रकरण : व्यवस्थापकाची होती २० टक्क्यांची भागीदारी

अमेरिकन नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या ठाण्यातील बोगस कॉल सेंटर प्रकरणात मंगळवारी आणखी एका व्यवस्थापकाला अटक झाली. त्याची या कंपनीत २० टक्क्यांची भागीदारी होती. कर चुकवणाऱ्या अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या ठाण्यातील बोगस कॉल सेंटर्सचा पर्दाफाश ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने आॅक्टोबर २०१६ मध्ये केला होता.
सध्या वन डेचा जमाना, टेस्टचा नाही; भाजपचे काँग्रेसला उत्तर

सध्या वन डेचा जमाना, टेस्टचा नाही; भाजपचे काँग्रेसला उत्तर

संसदेत केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठरावामुळे आज संध्याकाळी मतदान होणार आहे. सध्या लोकसभा अशात विरोधी पक्षांना बोलण्यासाठी अवघ्या 38 मिनिटांचा वेळ देण्यात आला. ज्यानंतर लोकसभेत एकच गदारोळ बघायला मिळाला. काँग्रेसने गदारोळ सुरू करतच वेळ वाढवून देण्याची मागणी केली. त्यावेळी संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार उभे राहिले आणि सध्याचा जमाना हा वनडेचा आणि टेस्ट मॅचचा नाही असे खोचक उत्तर दिले. 
दुरंतो एक्सप्रेसवर दरोडा, प्रवाशांचे दागिने, पैसे लंपास

दुरंतो एक्सप्रेसवर दरोडा, प्रवाशांचे दागिने, पैसे लंपास

जळगाव जवळील माहिजी स्टेशनवर उभ्या असलेल्या दुरंतो एक्सप्रेसवर दरोडा पडला. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता ही घटना घडली. यात अनेक प्रवाशांच्या पैसे आणि दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारला. जळगावकडून मुंबईकडे जाणारी दुरांतो एक्सप्रेस मध्यरात्री अडीच वाजता माहेजी स्टेशनजवळ उभी होती. त्याचवेळी दरोडा पडला. याप्रकरणी नागपुरच्या एका महिलेने इगतपुरी रेल्वे पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. 
बीजेडी खासदारांचा सभात्याग, 6 वाजता होणार मतदान

बीजेडी खासदारांचा सभात्याग, 6 वाजता होणार मतदान

लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांना धक्का बसला. बिजू जनता दलाच्या खासदारांनी सभात्याग करत अविश्वास प्रस्ताव मतदानावर बहिष्कार टाकला आहे. दुसरीकडे विरोधकांना चर्चेसाठी एकूण 39 मिनिटांचा वेळ देण्यात आला. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने पक्षाची बाजू मांडण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली. मात्र लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी यास नकार दिला.संध्याकाळी ६ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more