Short News

डी. एस. कुलकर्णींना परत जामीन मिळणार ? आज निकाल

डी. एस. कुलकर्णींना परत जामीन मिळणार ? आज निकाल

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. सुनावणीसाठी पत्नी हेमांगींसह उच्च न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश डीएसकेंना न्यायालयाने दिले आहेत. येताना रिकाम्या हाताने येऊ नका, पैसे उसने घ्या, भीक मागा, काहीही करा, लोकांचे पैसे कधी परत करणार याची माहिती द्या, असेही उच्च न्यायालयाने बजावले होते.
प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल यांचे निधन

प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल यांचे निधन

प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल यांचे मंगळवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा राहुल आणि संध्या, अलका, वर्षा या ३मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता बाणगंगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. गोयल यांना सकाळी सव्वादहाच्या दरम्यान त्रास होऊ लागला आणि ते घरातच कोसळले.
रितेश देशमुखने घेतली मोदीची फिरकी

रितेश देशमुखने घेतली मोदीची फिरकी

सध्या संपूर्ण देशभरात डायमंड व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बॅँकेत केलेल्या ११,५०० कोटी रूपयांच्या महाघोटाळ्याचीच चर्चा रंगत आहे. यास बॉलिवूडदेखील अपवाद नाही. नुकतेच अभिनेता रितेश देशमुख याने नीरव मोदीची फिरकी घेताना एक ट्विट केले. रितेशने त्याच्या ‘बॅँक चोर' या चित्रपटाचा एक फोटो शेअर करताना ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी एकटाच असा ‘बॅँक चोर' आहे जो अपयशी ठरला आहे.'
बारावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरूवात

बारावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरूवात

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीची लेखी परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी प्रत्येक वर्गातील प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.