Short News

आज हवामान खाते मान्सून अंदाज वर्तवणार

आज हवामान खाते मान्सून अंदाज वर्तवणार

भारतीय हवामान खाते आज मान्सूनचा अंदाज जाहीर करणार आहे. दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी अशा नाना अडथळ्यांमधून बळीराजा गेल्या काही वर्षांमध्ये जात आहे. त्यामुळे यंदा तरी चांगला पाऊस पडेल का? असा प्रश्न बळीराजाला सतावत आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर होणाऱ्या मान्सून अंदाजाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच स्कायमेट या संस्थेने सरासरी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. 
नो कॅश : आता होणार कोणी एटीएममधून किती पैसे काढल्याची चौकशी

नो कॅश : आता होणार कोणी एटीएममधून किती पैसे काढल्याची चौकशी

देशाच्या काही भागात जाणवत असलेली रोकड टंचाई आणि त्यावरून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी पावले उचलतानाच कोणत्या एटीएम केंद्रातून, कोणी आणि किती रोकड काढली आणि त्यामागचे कारण काय याची चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटतर्फे ही चौकशी केली जाणार आहे. 
चंद्रपुरात तापमानाचा पारा 45 अंशावर, राज्यातील 18 जिल्ह्यात उष्णतेची लाट

चंद्रपुरात तापमानाचा पारा 45 अंशावर, राज्यातील 18 जिल्ह्यात उष्णतेची लाट

विदर्भातील अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. सोमवारपर्यंत ही स्थिती कायम राहाणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान कार्यालयाने दिला आहे. महाराष्ट्रातील 18 हून अधिक जिल्ह्यांत पारा 40 अंशांवर पोहोचला. चंद्रपूरमध्ये 45.9 अंशांसह सलग तिसऱ्या दिवशी देशात सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आला आहे. तर सर्वच जिल्ह्यांत तापमान 41 अंशांवर नोंदवण्यात आले आहे. 
अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना आता फाशी, केंद्राची मंजूरी

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना आता फाशी, केंद्राची मंजूरी

कठुआ-उन्नाव-सूरत सामूहिक बलात्काराच्या घटनानंतर देशभरातून आक्रोश व्यक्त होत आहे. उन्नाव येथील प्रकरणात भाजप आमदारच मुख्य आरोपी आहे. यावरुन केंद्रातील मोदी सरकारवर देशभरातून प्रश्नांचा भडीमार होत असताना सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. 12 वर्षांच्या आतील मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल. कायदा करण्यासाठी अध्यादेश आणण्यास कॅबिनेटने मंजूरी दिली.