Short News

रेशन दुकानात तूरडाळ 35 रुपये  किलो

रेशन दुकानात तूरडाळ 35 रुपये किलो

राज्यातील ग्राहकांना रेशन दुकानांमधून तूरडाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. 35 रुपये प्रतिकिलो दराने ही तूरडाळ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या तूरीची डाळ केल्यानंतर हा दर निश्चित करण्यात आला आहे. राज्यातील शिधापत्रिका धारकांना तसेच सर्वसामान्य ग्राहकांना आता तूरडाळ प्रति किलो 35 रुपये दराने दिली जाणार आहे. 
महेंद्रसिंग धोनीमुळे दुसऱ्या खेळाडूंवर दबाव ; गंभीरची टीका

महेंद्रसिंग धोनीमुळे दुसऱ्या खेळाडूंवर दबाव ; गंभीरची टीका

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवशीय सीरिजमध्ये भारताच्या दारुण पराभवाचे आता विश्लेषण व्हायला सुरुवात झाली आहे. गांगुली आणि लक्ष्मण या खेळाडूंनी कर्णधार विराट कोहलीच्या निर्णयांवर आक्षेप घेतला आहे. आता भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं धोनवीर निशाणा साधला आहे. धोनीच्या संथ बॅटिंगमुळे त्याच्यासोबत खेळणाऱ्या बॅट्समनवरचा दबाव वाढत असल्याचं गंभीर म्हणाला. 
अविश्वास प्रस्तावावर शिवसेना काय करणार?, उद्धव ठाकरेंकडे नजरा

अविश्वास प्रस्तावावर शिवसेना काय करणार?, उद्धव ठाकरेंकडे नजरा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच टीडीपीने मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला. या ठरावावर शिवसेनेची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याबद्दलचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबद्दल शिवसेना खासदारांना बोलण्यास मनाई करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. 
आयसीसी रँकिंग: कोहली अव्वल स्थानी, कुलदीप यादवचीही सरशी

आयसीसी रँकिंग: कोहली अव्वल स्थानी, कुलदीप यादवचीही सरशी

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आयसीसी वनडे रँकिंगमधील आपले अव्वल स्थान कायम राखत कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ 911 अंकांची कमाई केली आहे. याबरोबरच कुलदीप यादवने सहाव्या स्थानासह गोलंदाजांच्या यादीत 10 गोलंदाजांमध्ये स्थान पटकावले आहे. कोहलीने 918 अंकांसह 1991 पासून अव्वल स्थानी असलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डीन जॉन्स याला मागे सारले आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more