Short News

मुनगंटीवारांच्या भेटीला उद्धव ठाकरेंचा नकार

मुनगंटीवारांच्या भेटीला उद्धव ठाकरेंचा नकार

भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटण्यासाठी तूर्तास तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नकार दिला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र उद्धव ठाकरेंनी वेळ दिली नाही. उद्धव ठाकरेंनी भेट नाकारल्यामुळे शिवसेना आणि भाजप युतीची चर्चा लांबणीवर पडली आहे. युतीच्या चर्चेला खीळ बसल्याची सूत्रांची माहिती आहे 
वेतनवाढीवर आयटी क्षेत्रातील कर्मचारी नाराज

वेतनवाढीवर आयटी क्षेत्रातील कर्मचारी नाराज

यंदा भारतीय आयटी क्षेत्रातील वेतनवाढ कमी असल्याने कर्मचारी नाराजी व्यक्त होत आहे. स्थिर वेतनाऐवजी ‘व्हेरिएबल पे'च्या स्वरूपातील तिमाही बोनस देण्याच्या पद्धतीवरही आयटी कर्मचाऱ्यांत असंतोष आहे. आघाडीची आयटी कंपनी ‘टीसीएस'ने बाजार भांडवलाचा 100 अब्ज डॉलरचा टप्पा गाठला, तेव्हा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी फेसबुकवरील ‘टीसीएस कन्फेशन' ग्रुपवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. 
सत्तेसाठी मिझोरममध्ये कट्टर विरोधक भाजपा-काँग्रेस एकत्र

सत्तेसाठी मिझोरममध्ये कट्टर विरोधक भाजपा-काँग्रेस एकत्र

एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजप व काँग्रेस मिझोरममध्ये एकत्र आले आहेत. मिझोरममधील चकमा स्वायत्त जिल्हा परिषदेत सत्तेसाठी भाजप-काँग्रेसने हातमिळवणी केली. 20 जागांपैकी काँग्रेसला 6 तर भाजपला 5 जागा मिळाल्या आहेत. तर मिझो नॅशनल फ्रंटने 8 जागा मिळवल्या. निकालानंतर काँग्रेस व भाजपने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे क्रीडामंत्री व काँग्रेस नेते झोडिंतुलंगा यांनी दिली. 
'या' फलंदाजाने मारला या सत्रातील सर्वात लांब  षटकार

'या' फलंदाजाने मारला या सत्रातील सर्वात लांब षटकार

एबी डेविलियर्स आणि क्विंटन डी कॉक यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर बंगळूरुने चेन्नईविरुद्ध सामन्यात 205 धावा केल्या. डेविलियर्सने 30 चेंडूत 8 षटकार आणि 2 चौकारांच्या सहाय्याने ६८ धावा केल्या. डिविलियर्सने ठाकूरच्या गोलंदाजीवर सलग 3 षटकार ठोकले. यातील एक तब्बल 111मीटर लांब गेला. यंदाच्या आयपीएलमधील हा सर्वात लांब षटकार आहे. चेंडू स्टेडियमच्या बाहेर निघून गेल्याने अंपायरने नवा चेंडू मागवला.