Short News

यवतमाळ येथे काँग्रेस नगरसेवकाच्या पुत्राची हत्या

यवतमाळ येथे काँग्रेस नगरसेवकाच्या पुत्राची हत्या

यवतमाळ शहरातील गुन्हेगारी वर्तुळात संघर्ष उफाळत असतानाच आता एका काँग्रेस नगरसेवकाच्या पुत्राची हत्या झाली आहे. कुख्यात अखिल सलीम शहा ऊर्फ छोटा सागवान, असे त्या हत्या झालेल्या नगरसेवक पुत्राचे नाव आहे. नगरेसवक सलीम सागवान यांचा मुलगा अखिल याचा भाऊ शहजाद सागवान हे देखील काँग्रेस नगरसेवक आहेत. नगरसेवक असलेले वडील सलीम सागवान सध्या देशी पिस्टल विक्री प्रकरणी कारागृहात आहेत. 
एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवाशांना मिळाले हे खास सरप्राईज
<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fdhol.blasters.75%2Fvideos%2F2107552549467555%2F&show_text=0&width=267" width="100%" height="300" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allowFullScreen="true"></iframe>

एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवाशांना मिळाले हे खास सरप्राईज

एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवाशांना खास सरप्राईज मिळाले. फ्लाईट टेक ऑफ होत असताना ढोल वाजवून प्रवाशांचे मनोरंजन करण्यात आले. ढोलसोबत गायलेले पंजाबी गाणे लोकांनी खूप एन्जॉय केले. लोकांनी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर देखील केला. फेसबुक पेज ढोल ब्लास्टर्स वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला.
आजीबाईंच्या शाळेची नोंद आता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

आजीबाईंच्या शाळेची नोंद आता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

गावातील साठीनंतरच्या पिढीला शिक्षित करण्याचा संकल्प मुरबाडजवळील नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या फांगणे गावातील ग्रामस्थांनी केला. दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या प्रयत्नांची दखल बघता बघता राष्ट्रीयच नाही तर आंतराष्ट्रीय पातळीवरदेखील घेतली गेली. ६० हून अधिक वय असलेल्या या आजीबाईंच्या शाळेची नोंद आता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
जिग्नेश मेवाणीने केला हा गंभीर आरोप

जिग्नेश मेवाणीने केला हा गंभीर आरोप

व्हॉट्स अॅप ग्रुपवरची चर्चा व्हायरल झाल्यानंतर गुजरातचे दलित नेते आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांनी आपल्या बचाव आणि सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. या ग्रुपमधील पोलीस अधिकाऱ्यांचे संभाषण व्हायरल झाल्यावर जिग्नेश मेवाणींनी असा आरोप केला आहे की हे पोलीस अधिकारी माझ्या एन्काऊंटरची चर्चा करत होते. त्यामुळे मला संरक्षणाची आवश्यकता आहे असेही जिग्नेश मेवाणी यांनी म्हटले आहे.