Short News

350 कोटी लोक पाहतील  फुटबॉलचे विश्चषक

350 कोटी लोक पाहतील फुटबॉलचे विश्चषक

फुटबॉलची सर्वात मोठी स्पर्धा फिफा वर्ल्ड कप आजपासून सुरू होत आहे. 32 दिवसांत संघांत 64 सामने होतील. रात्री साडेआठ वाजता रशिया विरुद्ध सौदी अरेबियाच्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. त्याअगोदर सायंकाळी साडेसहा वाजता उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. ब्रिटनचा पॉप स्टार रॉबी विल्यम्स, अमेरिकन कलाकार विल स्मिथचे सादरीकरण होणार आहे. 3.5 अब्ज लोक हा महासंग्रामचा अनुभवणार आहेत.
ट्रेड वॉरमुळ शेअर बाजार  कोसळला; सेन्सेक्स घसरला

ट्रेड वॉरमुळ शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स घसरला

जगात सुरु असलेल्या व्यापार युद्धाचा परिणाम आज शेअर बाजारावर झालेला दिसला. यामुळे भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झालेली दिसली. या घसरणीवरच आजचा बाजार बंद झाला आहे. आज सेन्सेक्स 262 अंकांनी खाली येत सेन्सेक्स 35,287अंकांवर आला. तर निफ्टी 89 अंकांनी घसरत 10,710 अंकांवर बंद झाला. या बाजारात एनएसईवरील सर्व क्षेत्रातील निर्देशांक हे लाल संकेतात बंद झाले.
आज सोने चमकले, चांदीच्या दरात मात्र घसरण

आज सोने चमकले, चांदीच्या दरात मात्र घसरण

आज सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. या दर वाढीसह प्रतिदहा ग्रामसाठी सोन्याचा दर 31900 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही ही तेजी दिसली. तर चांदीच्या दरात मात्र आज घसरण झालेली दिसली. चांदीच्या दरात 190 रुपयांची घसरण झाली. यासह चांदी 41000 रुपये प्रतिकिलो रुपये झाली आहे. यामुळे चांदी घेणाऱ्याची चांदी झाली तर सोने घेणाऱ्या ग्राहकांना थोडा अधिक आर्थिक भार सोसावा लागला. 
'पगडी' राजकारण करून मराठी माणसात फूट पाडण्याचा डाव'

'पगडी' राजकारण करून मराठी माणसात फूट पाडण्याचा डाव'

शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षाच्या 52 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना 'पगडी'वादावर भाष्य केले. दैवतांच्या पगड्यांचे राजकारण करू नका. पगड्यांचे राजकारण करणाऱ्यांना मराठी माणूस धडा शिकवील, अशा शब्दांत ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्ला केला. पगड्यांमुळे लोक प्रसिध्द झाले असून लोकांच्या कार्यामुळे पगड्या प्रसिध्द झाल्या आहेत असे म्हटले. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more