Short News

हॉकीपटूंना  मिळणार 50 हजारांचा भत्ता

हॉकीपटूंना मिळणार 50 हजारांचा भत्ता

हॉकीपटूंना 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम' (टॉप्स) योजनेअंतर्गत मासिक 50 हजार रुपयांचा भत्ता देण्यात येणार आहे. केंद्रीय क्रिडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्याता आला. 2020 आणि 2024 रोजी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा लक्षात घेता 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम' योजनेअंतर्गत खेळाडूंना तयारीसाठी लागणारी आर्थिक मदत पुरविली जाणार आहे. 
बीजेडी खासदारांचा सभात्याग, 6 वाजता होणार मतदान

बीजेडी खासदारांचा सभात्याग, 6 वाजता होणार मतदान

लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांना धक्का बसला. बिजू जनता दलाच्या खासदारांनी सभात्याग करत अविश्वास प्रस्ताव मतदानावर बहिष्कार टाकला आहे. दुसरीकडे विरोधकांना चर्चेसाठी एकूण 39 मिनिटांचा वेळ देण्यात आला. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने पक्षाची बाजू मांडण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली. मात्र लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी यास नकार दिला.संध्याकाळी ६ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. 
सिलेक्शन काऊच प्रकरणी बीसीसीआयची कारवाई

सिलेक्शन काऊच प्रकरणी बीसीसीआयची कारवाई

क्रिकेटमधल्या सिलेक्शन काऊच प्रकरणी बीसीसीआयने कारवाई करणार आहे. बीसीसीआयने आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या एक्झिक्युटिव्ह असिस्टंट मोहम्मद अकरम सैफी याचे चौकशी होईपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या एका क्रिकेटपटूने सैफी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राजीव शुक्ला सध्या उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे संचालक आहेत.
हॉटेल स्टाफला रोनाल्डोची लाखो रुपयांची टीप, आकडा पाहून उंचावल्या भुवया

हॉटेल स्टाफला रोनाल्डोची लाखो रुपयांची टीप, आकडा पाहून उंचावल्या भुवया

पोर्तुगाल फुटबॉल टीमचा कॅप्टन आणि नंबर 1 फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील श्रीमंत खेळाडुंपैकी आहे. फिफा वर्ल्डकप 2017 च्या क्वार्टर फायनलमधून टीम बाहेर पडल्यानंतर फॅमिलीसोबत तो सुट्टी एंजॉय करायला गेला.  रोनाल्डोने ग्रीसमध्ये ज्या हॉटेलमध्ये जेवण केले तिथून निघताना हॉटेल स्टाफसाठी 17,850 पाऊंड म्हणजेच 15 लाख 99 हजार 931 रुपये टीप म्हणून दिले. हा आकडा पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more