Short News

धोनीच्या विकेटकीपिंगचे खास सांयन्स; कधीच करत नाही सराव

धोनीच्या विकेटकीपिंगचे खास सांयन्स; कधीच करत नाही सराव

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी आपल्या नेतृत्वासोबच खास विकेटकीपिंगसाठीही प्रसिद्ध आहे. विकेटकीपिंगमध्ये त्याचे स्वत:चे खास असे सायन्स आहे. विकेटकीपिंगसाठी धोनी अजिबात सराव करत नाही. तंदुरूस्तीच्या कारणामुळे धोनी खूपच कमी वेळा मैदानाबाहेर राहिला आहे. विकेटकीपिंगच नव्हे तर, नेतृत्व, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण असा सर्वच गोष्टींमध्ये त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे.
सुरक्षा दलाच्या जवानांकडून मुफ्ती यासिरला कंठस्नान

सुरक्षा दलाच्या जवानांकडून मुफ्ती यासिरला कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुफ्ती यासिर याला कंठस्नान घालण्यात आले आहे. पोलीस महासंचालक एसपी वैद यांनी आपल्या ट्वीटरवरुन ही माहिती दिली आहे. 'यासिर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसहूद अझहर याचा उजवा हात मानला जायचा.  
दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन पहिले नेते

दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन पहिले नेते

उद्या आशिया आणि पर्यायाने जागतिक शांततेच्या दिशेने नवे पाऊल टाकणार आहे. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांची अणूकार्यक्रमासह इतर अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. 1953 नंतर उत्तर कोरियाची सीमा ओलांडून दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन हे पहिले उ.कोरियन नेते असतील. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन आणि  किम यांची सकाळी स्थानिकवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता भेट होणार आहे. 
आजच्या दिवशीच चंद्रावर उतरले होते अमेरिकेचे यान

आजच्या दिवशीच चंद्रावर उतरले होते अमेरिकेचे यान

इतिहासात 26 एप्रिलची तारखेला अनेक कारणांनी महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय गणिततज्ञ रामानुजन यांचे निधन आणि रुस मधील चेरनोबिल परमाणूची घटना यांचा समावेश आहे. तसेच हा दिवस अमेरिकेच्या अंतराळच्या इतिहासासाठीही महत्तवपुर्ण आहे. यादिवशीच अमेरिकेचे एक अंतराळ यान चंद्रावर उतरले होते. देश आणि जगातील ही एक महत्त्वाची घटना 26 एप्रिल रोजी झाली होती.