Short News

आशियाई अजिंक्यपद हॉकी – भारतीय महिलांनी दिली चीनला मात

आशियाई अजिंक्यपद हॉकी – भारतीय महिलांनी दिली चीनला मात

वंदना कटारियाने केलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने बलाढ्या चीनवर 3-1 ने मात केली आहे. या स्पर्धेतला भारतीय महिलांचा हा दुसरा विजय ठरला आहे. या विजयासह भारतीय महिलांनी स्पर्धेत आपले पहिले स्थान कायम राखलेले आहे, गुरजित कौरने 51 व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताचा तिसरा गोल केला. चीनकडून 15 व्या मिनिटाला वेन डॅनने एकमेव गोल झळकावला. 
कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबीयांनाही क्लीन चीट

कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबीयांनाही क्लीन चीट

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सरकारी नामुष्कीने दोषमुक्त ठरलेले काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबीयांनाही लाचलुचप्रतिबंधक न्यायालयातून मंगळवारी दिलासा मिळाला. कृपाशंकर सिंह यांची पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्र मोहन, मुलगी सुनिता, जावई विजय सिंह आणि सून अंकिता या सर्वांना मंगळवारी न्यायालयाने क्लीन चीट दिली. या खटल्यात कृपाशंकर सिंह यांना दोषमुक्त करण्यात आले होते.
तापसीच्या 'मुल्क' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

तापसीच्या 'मुल्क' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

बॉलिवुडची 'पिंक गर्ल' तापसी पन्नूचा आगामी 'मुल्क' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला असून, यामध्ये तापसी पुन्हा एकदा कोर्टात पाहायला मिळत आहे. या फर्स्ट लूकमध्ये ती एका वकीलाच्या वेशात दिसत आहे. तापसीने तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर हा फर्स्ट लूक शेअर केला.
निपाह व्हायरसमुळे नर्सचा बळी; मृत्युपूर्वी पतीला लिहिले हृदयद्रावक पत्र

निपाह व्हायरसमुळे नर्सचा बळी; मृत्युपूर्वी पतीला लिहिले हृदयद्रावक पत्र

केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात पसरलेल्या घातक आणि तितक्याच दूर्मिळ निपाह व्हायरसमुळे आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. यात पोरांबरा तालुका रूग्णालयात कर्तव्य बजावत असलेल्या लिनी (वय३१) नावाच्या एका नर्सचाही समावेश आहे. दरम्यान, लिनीने मृत्यूपूर्वी मोठा त्याग केला आहे. ज्याची प्रसारमाध्यमांतून चर्चा होत आहे. आपल्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याचे समजताच लिनीने स्वत:ला कुटुंबियांपासून दूर ठेवले.