Short News

डेव्हिड वॉर्नर लवकरच उतरणार क्रिकेटच्या मैदानात

डेव्हिड वॉर्नर लवकरच उतरणार क्रिकेटच्या मैदानात

चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दोषी आढळला होता. त्यामुळे वॉर्नरवर एका वर्षाची बंदीही घालण्यात आली होती. पण या प्रकरणाला दोन महिने होत नाही तर वॉर्नर पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. वॉर्नर वर्षभर आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकणार नसला तरी तो क्लब क्रिकेच मात्र नक्कीच खेळू शकतो. त्यानुसार वॉर्नर सिडनीतील रेंडविक पीटरशॅम या क्लबमधून खेळणार आहे. 
कोलकात्याचा राजस्थानवर 25 धावांनी विजय

कोलकात्याचा राजस्थानवर 25 धावांनी विजय

कोलकात्याने आज राजस्थानवर 25 धावांनी विजय प्राप्त करत थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. कोलकात्याने दिलेले 170 धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान 20 षटकात केवळ 144 धावाच करू शकले. राजस्थानकडून संजु सॅमसन (50) आणि कर्णधार रहाणे (46) यांनी चांगली खेळी केली पण विजय प्राप्त करण्यात अपयश आले. पियूष चावलाने 4 षटकांत 24 धावा देत 2 बळी बाद केले.
कोलकात्याचे राजस्थानपुढे 170 धावांचे आव्हान

कोलकात्याचे राजस्थानपुढे 170 धावांचे आव्हान

कोलकाताने निर्धारीत 20 षटकांत 169 धावा करत राजस्थानसमोर 170 धावांचे आव्हान ठेवले आहे. राजस्थानकडून कर्णधार दिनेश कार्तिकने 38 चेंडूत 4 चौकार 2 षटकाराच्या जोरावर 52 धावा केल्या तर आंद्रे रसेलने 25 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 49 धावा करत नाबाद राहिला. राजस्थानकडून क्रिष्णापा गौतमने 3 षटकांत 15 धावा देत 2 गडी बाद केले.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत दिलासा नाही

मंत्रीमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत दिलासा नाही

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पेट्रोल-डिझेलची वाढती दरवाढ रोखण्याबाबत निर्णय होईल अशी आशा होती. मात्र, ही आशा फोल ठरली असून इंधन दरवाढीबाबत बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. उलट, पेट्रोलिअम उत्पादनातून मिळणाऱ्या अबकारी कराचा वापर महामार्ग आणि एम्ससारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रुग्णालयांच्या निर्मितीसाठी करण्यात येतो.