Short News

जिम्नॅस्टिक दीपा कर्माकर 'या' कारणामुळे मुकणार राष्ट्रकुल स्पर्धेला

जिम्नॅस्टिक दीपा कर्माकर 'या' कारणामुळे मुकणार राष्ट्रकुल स्पर्धेला

भारताची जिम्नॅस्टिक दीपा कर्माकर आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे संकेत तिचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांनी दिले आहेत.एप्रिल महिन्यात तिच्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यातून ती पूर्णपणे बरी झाली नसल्याचे नंदी यांनी सांगितले. ‘दीपा अद्यापही पूर्णपणे तंदुरुस्त झालेली नाही. तिला आणखी काही काळ लागेल. तिच्या दुखापतीबाबत कोणताही धोका पत्करायचा नसल्याचे नंदी यांनी सांगितले.
Gionee भारतात लॉन्च केला S11 Lite आणि F205 स्मार्टफोन

Gionee भारतात लॉन्च केला S11 Lite आणि F205 स्मार्टफोन

चायना कंपनी जिओनी Gionee ने 2018 वर्षात आपला स्मार्टफोन Gionee S11 Lite आणि F205 ला लॉन्च केले आहे. कंपनीचे दोन्ही स्मार्टफोन फूल व्ह्यू डिस्प्ले दिले आहेत. 18.9च्या एस्पेक्ट रेश्यो मध्ये येत आहे. कंपनीने मागील वर्षात हे दोन्ही फोन्स चीनमध्ये लॉन्च केले होते. Gionee S11 Lite आणि F205ची किंमत अनुक्रमे 13,999 रुपये आणि 8,999 रुपये आहे. S11 Lite काळ्या,सोनेरी गर्द निळ्या रंगात उपलब्ध असणार आहे. 
शुटिंग संपताच 'गली बॉय' रणवीर गेला सुट्टीवर

शुटिंग संपताच 'गली बॉय' रणवीर गेला सुट्टीवर

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंगने नुकतेच 'गली बॉय'चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. शूटिंग पूर्ण होताच रणवीर सिंग ब्रेक घेऊन व्हेकेशनवर गेला आहे. रणवीर सिंगने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताच रणवीरच्या फॅन्सनी त्याला कुठे चलला फिरायला असे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. रणवीर आपल्या आवडत्या देशात स्वित्झर्लंडला गेला आहे.
सोयाबीनला पर्याय एरंडी, उत्पादनात वाढ

सोयाबीनला पर्याय एरंडी, उत्पादनात वाढ

भारतातून एरंडी तेलाच्या निर्यातीत तिप्पट वाढ होऊन ती 6 ते 6.50 लाख टनाच्या घरात पोहोचली आहे. जगभरात एरंडीच्या तेलाची मागणी सातत्याने वाढत असल्याने शेतकऱ्यांसाठी हे पीक कायम मिळकत देणारे आहे. भविष्यात सोयाबीन उत्पादकांनीही पर्याय म्हणून हे पीक घेण्यात अडचण नाही. गुजरातमध्ये असोसिएशनने राबविलेल्या प्रयोगातून तेथील शेतकºयांच्या एरंडी उत्पादनात तिपट वाढ झाली आहे.