Short News

फेडरेशन चषकातील कामगिरी उत्साहवर्धक - सानिया मिर्झा

फेडरेशन चषकातील कामगिरी उत्साहवर्धक - सानिया मिर्झा

अंकिता रैनाच्या बळावर फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेत भारताने फार चांगली कामगिरी केली. ही कामगिरी उत्साहवर्धक होती, असे म्हणत टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने भारतीय संघ मात्र पुढील फेरी गाठण्याचा हकदार होता, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या रेलिगेशन प्ले ऑफ लढतीत भारतीय संघाने चायनीज तायपेईवर २-० ने विजय नोंदवित आशिया-ओसियाना ग्रुपमध्ये स्थान कायम राखले.
कानपूरमध्ये अंकित तिवारीचा विवाहसोहळा संपन्न

कानपूरमध्ये अंकित तिवारीचा विवाहसोहळा संपन्न

‘सुन रहा है ना तू', ‘गलियाँ' यांसारख्या गाण्यांमध्ये प्रकाशझोतात आलेला गायक अंकित तिवारी विवाहबंधनात अडकला. व्यवसायाने इंजिनीअर असलेल्या पल्लवी शुक्लाशी कानपूरमध्ये अंकितने लग्नगाठ बांधली. त्याने स्वत: सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत पत्नीसाठी सुरेख मेसेजदेखील लिहिला आहे. ‘तूच माझी वर्तमान आणि माझं भविष्यही तूच आहेत,' असं कॅप्शन अंकितने या फोटोंना दिलं आहे.
एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवाशांना मिळाले हे खास सरप्राईज
<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fdhol.blasters.75%2Fvideos%2F2107552549467555%2F&show_text=0&width=267" width="100%" height="300" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allowFullScreen="true"></iframe>

एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवाशांना मिळाले हे खास सरप्राईज

एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवाशांना खास सरप्राईज मिळाले. फ्लाईट टेक ऑफ होत असताना ढोल वाजवून प्रवाशांचे मनोरंजन करण्यात आले. ढोलसोबत गायलेले पंजाबी गाणे लोकांनी खूप एन्जॉय केले. लोकांनी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर देखील केला. फेसबुक पेज ढोल ब्लास्टर्स वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला.
आजीबाईंच्या शाळेची नोंद आता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

आजीबाईंच्या शाळेची नोंद आता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

गावातील साठीनंतरच्या पिढीला शिक्षित करण्याचा संकल्प मुरबाडजवळील नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या फांगणे गावातील ग्रामस्थांनी केला. दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या प्रयत्नांची दखल बघता बघता राष्ट्रीयच नाही तर आंतराष्ट्रीय पातळीवरदेखील घेतली गेली. ६० हून अधिक वय असलेल्या या आजीबाईंच्या शाळेची नोंद आता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.