Short News

इमरान ताहिरचा टीम इंडियाच्या चाहत्यावर गंभीर आरोप

इमरान ताहिरचा टीम इंडियाच्या चाहत्यावर गंभीर आरोप

चौथ्या एक दिवशीय आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये भारताच्या चाहत्याने आपल्याला वर्ण भेदावरून हिणवल्याचा आरोप केला आहे. याच्या चौकशीसाठी क्रिकेट बोर्डाकडे तक्रार केली आहे. ताहिर जोहानिसबर्गमध्ये पावसामुळे खेळला नव्हता. ज्यामध्ये भारत 5 विकेटने हरला होता. दक्षिण आफ्रिकेच्या टीम मॅनेजर मोहम्मद मूसाजीने सांगितले की, ताहिर 12 व्या खेळाडूची भूमिका सांभाळत होता त्यावेळी त्याच्या वर्णभेदाची टिप्पणी झाली.
मालदीवमधील आणीबाणीला मुदतवाढ द्या - राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन

मालदीवमधील आणीबाणीला मुदतवाढ द्या - राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन

मालदीवचे राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी देशात लागू असलेल्या आणीबाणीला १५ दिवसांची वाढीव मुदत मिळावी, अशी आज संसदेला विनंती केली आहे. देशात राजकीय अराजक असल्यामुळे ही मुदत वाढावी, असे अब्दुल्ला यामीन यांनी म्हटले आहे. मालदीवच्या संसदेमध्ये बोलाविण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या विनंतीवर चर्चा करण्यात आली. 
शेअर बाजार गडगला;  सेन्सेक्स २३६ अंकांनी तर निफ्टी ७४ अंकांनी घसरला

शेअर बाजार गडगला; सेन्सेक्स २३६ अंकांनी तर निफ्टी ७४ अंकांनी घसरला

 सोमवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २३६ अंकांनी घटत ३३, ७७४ वर आला. तर निफ्टी ७४ अंकांनी उतरत १०,३७८ वर व्यवहार बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये मिडकॅपमध्ये १.०७ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅपमध्ये १.४२ टक्यांनी घट झालेली दिसली. बीएसईमधील सर्व १९ सेक्टरच्या शेअर्स घसरण झालेली दिसली.
नीरव मोदीला त्याच्या पापाची शिक्षा होईल ; रामदेव बाबांनी दिला शाप

नीरव मोदीला त्याच्या पापाची शिक्षा होईल ; रामदेव बाबांनी दिला शाप

मी फक्त एकाच मोदीला ओळखतो, ते म्हणजे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त जे पण मोदी आहेत जे, घोटाळे करतात त्यांच्यामुळे देशाचे नाव खराब होते. नीरव मोदीला त्याच्या पापाचे फळ मिळेल. मोदी सरकार त्याला त्याच्या योग्य जागी पाठवेल, असा विश्वास योग गुरु रामदेव बाबांनी व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यातील मुलमध्ये योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी रामदेव बाबा आले होते.