Short News

दहाव्या दिवशी भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत केला इतिहास

दहाव्या दिवशी भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत केला इतिहास

राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी एक इतिहास केला. 10व्या दिवशी भारताने तब्बल 17 पदके जिंकली. राष्ट्रकुलच्या इतिहासात भारताने आधी कधीही एकाच दिवसात इतकी पदके जिंकली नव्हती. 2010मध्ये एकाच दिवशी 15 पदके जिंकली होती. टेबल टेनिस एकेरी व भालाफेकीत प्रथमच सुवर्ण मिळाले. भारताने बॉक्सिंगमध्ये 6, कुस्तीत4, टेबल टेनिसमध्ये 3आणि बॅडमिंटन, स्क्वॅश, भालाफेक, नेमबाजीत 1-1 पदक पटकावले.  
स्कूटीवरुन जाणाऱ्या मॉडेलचा स्कर्ट ओढण्याचा प्रयत्न

स्कूटीवरुन जाणाऱ्या मॉडेलचा स्कर्ट ओढण्याचा प्रयत्न

मध्यप्रदेशातील इंदौर शहरात भररस्त्यात एका मॉडलचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोन तरुणांनी स्कुटरवरून जाणाऱ्या या मॉडलचा स्कर्ट ओढला. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही मॉडल रस्त्यावर कोसळून जखमी झाली आहे. या मॉडलने अनेक ट्विट करून ही धक्कादायक माहिती दिली आहे. मी दुचाकीवरून जात होते. दोन तरुणांनी माझा स्कर्ट खेचण्याचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले. 
मानसी नाईक साकारणार तब्बल 28 भूमिका

मानसी नाईक साकारणार तब्बल 28 भूमिका

'वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्यावर थिरकत रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री मानसी नाईक आता रुपेरी पडद्यावर हटके अंदाजात पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक, दिग्दर्शक आणि ४ राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आगामी 'जी लो अपनी फिल्मी ख्वाईशें' या सिनेमात मानसी झळकणार आहे. या सिनेमाची खासियत म्हणजे मानसी यांत एक दोन नाहीतर तब्बल 28 व्यक्तीरेखा साकारणार आहे.
चीनमधील 22 तर भारतातील 19 कोटी लोक बँकेपासून वंचित

चीनमधील 22 तर भारतातील 19 कोटी लोक बँकेपासून वंचित

जग वेगाने डिजिटल होत दिसत असून सर्व व्यवहार क्रेडिट आणि डेबिट कार्डने होत आहेत. परंतु यात आणखीन एक वास्तव आहे,भारतातील सुमारे १९ कोटी वयस्कर व्यक्तींचे कोणत्याच बँकेत खाते नाही.चीनमधील 22 कोटी जनतेचे बँकेत खाते नाही. जागतिक बँकेने याचा अहवाला सादर केला. दरम्यान भारतात आर्थिक सुधारणा होत असून खातेधारकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान देशातील  खातेधारकांची संख्या वाढत आहे.