Short News

नाणेफक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

नाणेफक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

आता पाचवा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाच्या वाटेवर परतला आहे. पहिले तिन्ही सामने त्यांनी गमावले. पण चौथा सामना जिंकून त्यांनी मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. त्यामुळे हा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडी घेतो की दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयी घोडदौड कायम राखतो, हा पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सिरीयामध्ये लष्कराने केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू

सिरीयामध्ये लष्कराने केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू

सीरियामध्ये सेना आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी २४ तासात केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटेनमधील संघटना 'सीरियन आब्जर्वेटरी फार ह्यूमन राइट्सने म्हटलं की, दमिश्कच्या उपनगरात केलेल्या हवाई हल्ल्यात ३२५ लोकं जखमी झाले. दमिश्क सरकारने म्हटलं की, हल्ला फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करुन करण्यात आला.
विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

डीबी रिअॅलिटी कंपनीचे मालक विनोद गोएंका यांचे भाऊ प्रमोद गोएंका यांचं आफ्रिकन देश मोझॅम्बिकमधून अपहरण झाल्याची माहिती आहे. शनिवारपासून प्रमोद गोएंका बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. प्रमोद काही वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसायातून बाहेर पडले होते. त्यांनी स्वतःचा दागिन्यांचा व्यवसाय सुरु केला आहे.
सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

पीएनबी घोटाळ्यानंतर गडगडलेल्या शेअर बाजार मंगळवारी सावरलेला दिसला. आज सकाळच्या सत्रात सेंसेक्समध्ये 150 अंकाची तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीमध्ये 40 अंकाची वाढ झाली आहे. सध्या सेंसेक्स 33926.57 वर व्यवहार करत असून निफ्टी मध्ये 10417.35 अंकाची वाढ आहे. तरीही बँकेचे शेअर खाली येत आहे.