Short News

भारतीय चाहत्याने मला वर्णद्वेषी शिवीगाळ केली- इम्रान ताहीरचा आरोप

भारतीय चाहत्याने मला वर्णद्वेषी शिवीगाळ केली- इम्रान ताहीरचा आरोप

चौथ्या एकदिवसीय क्रिकेट लढतीदरम्यान भारताच्या एका चाहत्याने वर्णद्वेषी शिवीगाळ केल्याचा आरोप दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीरने केला आहे. याची गंभीर दखल घेत दक्षिण आफ्रिका बोर्डाने  चौकशीचे आदेश दिले आहे. जोहान्सबर्गमध्ये चौथ्या लढती दरम्यान भारताच्या चाहत्याने ताहीराला उद्देशून वर्णद्वेषी शिवीगाळ केली. अशी माहिती दक्षिण आफ्रिका संघाचे व्यवस्थापक मोहम्मद मुसाजी यांनी दिली.
आज रेडमी नोट 5 खरेदी करण्याची सुवर्णसंधी

आज रेडमी नोट 5 खरेदी करण्याची सुवर्णसंधी

शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन विक्रीसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे. आतापर्यंत या फोनची विक्री फ्लॅश सेलमध्ये केली जात होती, मात्र संपूर्ण दिवसभर हा फोन खरेदी करण्याची संधी आहे. रेडमी नोट 5ची विक्री केवळ Mi.com या कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर केली जाईल. कंपनीने ट्विटरवरुन याची माहिती दिली. रात्री 12वाजेपासून रेडमी नोट5 विक्रीसाठी उपलब्ध होईल. 
विश्वचषक जिंकणे माझे स्वप्न नाही- एबी डिवीलिअर्स

विश्वचषक जिंकणे माझे स्वप्न नाही- एबी डिवीलिअर्स

2019 चा विश्वचषक जस जसा जवळ येत आहे तसे अनेक खेळाडूंची विधाने समोर येत आहेत. त्यातच दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिवीलिअर्सने माध्यामांशी बोलताना मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेकांना धक्काच बसला आहे. 2019 चा विश्वचषक जिंकणे हे माझे अंतिम स्वप्न नसल्याचे एबी डिवीलिअर्स म्हणाला. आपले विचार बदलले असून आपण एकावेळी एकाच स्पर्धेचा विचार करत असल्याचेही तो म्हणाला. 
शेतकऱ्यांना 2001 पासून कर्जमाफी देण्यास मंजुरी

शेतकऱ्यांना 2001 पासून कर्जमाफी देण्यास मंजुरी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ 2001 ते 2009 या कालावधीतील थकबाकीदार शेतकऱ्यांना देण्याविषयीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे 2008 व 2009 च्या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही आता कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल. इमूपालन, शेडनेट, पॉलिहाऊस यासाठी 2001 ते 2016 दरम्यान घेतलेल्या मात्र थकीत राहिलेल्या कर्जाचाही यात समावेश आहे.