पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाने उडवला आफ्रिकेचा धुव्वा
क्रीडा
- 2 month, 7 days ago
भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध पहिल्या टी २० सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. भारताकडून मिताली राजने नाबाद अर्धशतकी खेळी करून भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी २० षटकात १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली होती.