Short News

एरिक सिमन्स चेन्नई सुपरकिंग्जचे गोलंदाजी सल्लागार

एरिक सिमन्स चेन्नई सुपरकिंग्जचे गोलंदाजी सल्लागार

दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आल्यानंतर नवीन हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जने एरिक सिमन्स यांना गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून संघात दाखल करुन घेतलं आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या संघ व्यवस्थापनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू असलेल्या सिमन्स यांनी याआधी भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे.
विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

डीबी रिअॅलिटी कंपनीचे मालक विनोद गोएंका यांचे भाऊ प्रमोद गोएंका यांचं आफ्रिकन देश मोझॅम्बिकमधून अपहरण झाल्याची माहिती आहे. शनिवारपासून प्रमोद गोएंका बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. प्रमोद काही वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसायातून बाहेर पडले होते. त्यांनी स्वतःचा दागिन्यांचा व्यवसाय सुरु केला आहे.
सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

पीएनबी घोटाळ्यानंतर गडगडलेल्या शेअर बाजार मंगळवारी सावरलेला दिसला. आज सकाळच्या सत्रात सेंसेक्समध्ये 150 अंकाची तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीमध्ये 40 अंकाची वाढ झाली आहे. सध्या सेंसेक्स 33926.57 वर व्यवहार करत असून निफ्टी मध्ये 10417.35 अंकाची वाढ आहे. तरीही बँकेचे शेअर खाली येत आहे.
ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमल देसाई यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमल देसाई यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेत्या माजी आमदार कमल देसाई यांचे गोरेगाव येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या ९७ वर्षाच्या होत्या. कमल देसाई ह्या आणीबाणीच्या काळात तरुंगात होत्या. त्यांनी मृणाल गोरे यांच्यासह अनेक आंदोलनात सहभाग घेतला. गोरगरीबांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक आंदोलन केले.