Short News

दुखापतीमुळे झूलन गोस्वामी दक्षिण अफ्रिकेविरूद्धचा सामना खेळणार नाही

दुखापतीमुळे झूलन गोस्वामी दक्षिण अफ्रिकेविरूद्धचा सामना खेळणार नाही

टाचेला झालेल्या दुखापतीमुळे भारताची अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामी आज दक्षिण अफ्रिकेविरूद्धचा सामना खेळू शकणार नाही. मंगळवारपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होत आहे. या मालिकेदरम्यान टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असल्यासे मानले जात आहे. दरम्यान, बीसीसीआयने दिलेल्या एका प्रतिक्रियेत म्हटले आहे की, 'झूलनच्या टाचेला दुखापत झाली आहे.
'झिरो' ठरला श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट

'झिरो' ठरला श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट

बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले. वयाच्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या श्रीदेवी यांनी गेल्याच वर्षी चित्रपट कारकीर्दीचा सुवर्ण महोत्सव पूर्ण केला. शाहरुख खानच्या आगामी 'झिरो' चित्रपटात श्रीदेवींचे अखेरचे दर्शन होणार आहे. मॉम हा श्रीदेवी यांच्या कारकीर्दीतला ३०० वा सिनेमा होता. झिरो सिनेमा हा ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 
केपटाऊन विजय:  रैना सामनावीर तर भुवनेश्वर ठरला मालिकावीर

केपटाऊन विजय: रैना सामनावीर तर भुवनेश्वर ठरला मालिकावीर

केपटाऊनच्या ट्वेन्टी२० सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी रोमांचक विजय मिळवला. भारताने या विजयासह तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. भुवनेश्वरने चार षटकांत केवळ २४ धावा देऊन २ फलंदाजांना माघारी धाडले. या संपूर्ण मालिकेत भुवनेश्वराच्या कामिगीरीमुळे त्याला मालिकावीर घोषित केले. तर ४३ धावांची दमदार खेळी करणाऱ्या सुरेश रैनाला सामनावीर घोषित करण्यात आले. 
पॅकिंग दुध घेतायत सावधान ! ७१ टक्के दुधात होतेय भेसळ

पॅकिंग दुध घेतायत सावधान ! ७१ टक्के दुधात होतेय भेसळ

राज्यभरातील विकल्या जाणाऱ्या दुधात भेसळ होत असल्याचे समोर आले आहे. तबेल्यांतून ७१ टक्के आणि पिशव्यांमधून विकले जाणारे ब्रँडेड दुधाचे ६५ टक्के नमुने सदोष आढळले आहेत. कंझ्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियाने केलेल्या तपासणीत हे सत्य समोर आले आहे. एफएसएसएआयने दुधातील घटक पदार्थांचे प्रमाण निश्‍चित केले आहे. त्यानुसार माणसाला पिण्यायोग्य दूध ठरवले जाते.