Short News

अखेर हिटमॅन रोहित शर्माने सचिनचा 'तो' विक्रम मोडला

अखेर हिटमॅन रोहित शर्माने सचिनचा 'तो' विक्रम मोडला

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारतीय संघात सुरू असलेल्या पाचव्या वनडे सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने नाबाद अर्धशतकी खेळी केली. ही खेळी करताना त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक खास विक्रम मोडला. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जात सचिन तेंडुलकरच्या २६४ षटकारांचा विक्रम मोडला.
अमेरिका भारताला शक्तिशाली F-35 ची टेक्नॉलॉजी देण्यास तयार

अमेरिका भारताला शक्तिशाली F-35 ची टेक्नॉलॉजी देण्यास तयार

इंडियन एअर फोर्सकडून फायटर विमानांची ऑर्डर मिळवण्यासाठी स्पर्धेत असलेल्या लॉकहीड मार्टिन कॉर्प कंपनीने F-16 विमानांमध्ये पाचव्या पीढीच्या लढाऊ विमानाचे तंत्रज्ञान देण्याची तयारी दाखवली आहे. F-35 हे अमेरिकेचे पाचव्या पीढीचे फायटर विमान आहे. जगातील शक्तिशाली, अत्याधुनिक फायटर जेटमध्ये या विमानाचा समावेश होतो. लॉकहीडचे भारतातील उपाध्यक्ष विवेक लाल यांनी ही माहिती दिली. 
लोकसभा निवडणूक लढवण्याचे कैन्हयाने दिले संकेत

लोकसभा निवडणूक लढवण्याचे कैन्हयाने दिले संकेत

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी शहला रशीद आणि कन्हैया कुमार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. या दोघांनी कायमच भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारला विरोध दर्शवला आहे. कन्हैया कुमार हा जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता आहे. तर शहला रशीद ही जेएनयूतील पीएचडीची विद्यार्थीनी असून ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनची ची उपाध्यक्ष होती. 
बहुदेशीय प्रणालीच्या फेररचनेसाठी फ्रान्सची अमेरिकेला हाक

बहुदेशीय प्रणालीच्या फेररचनेसाठी फ्रान्सची अमेरिकेला हाक

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी बहुदेशीय व्यापाराची पुर्नरचना करण्यासाठी अमेरिकेला मदतीचे आवाहन केले. बहुदेशीय व्यापार ही संकल्पना निर्माण करण्यात अमेरिकेची निर्णायक भूमिका राहिलेली आहे, असे ते म्हणाले. युएस काँग्रेसच्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. 'बहुदेशीय व्यापार' या संकल्पनेला प्रत्यक्षात अमेरिकेने आकार दिल्याचे ते म्हणाले.