Short News

मला खेळात जिंकयचेच होते, निर्धार पक्का होता  - सायना नेहवाल

मला खेळात जिंकयचेच होते, निर्धार पक्का होता - सायना नेहवाल

'मी आशा कधीही सोडली नव्हती. मला लढायचे होते. पुन्हा एकदा जिंकण्याचा निर्धार पक्का होता...' हे उद्गार आहेत, गोल्ड कोस्ट राष्ट्रकुलमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे. 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून पदकाची अपेक्षा असताना तिला पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. या सर्वांवर मात करीत तिने सुवर्ण पदक मिळवले.
प्रियंकाला प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचे आमंत्रण

प्रियंकाला प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचे आमंत्रण

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. लंडनमध्ये 19मे रोजी ते दोघे लग्नाच्या गाठीत अडकणार आहेत. या लग्नाचे आमंत्रण बॉलिवूडमधील देखील एका अभिनेत्रीला आले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून देसी गर्ल प्रियांका चोप्रा आहे.19 मे रोजी होणाऱ्या लग्नाच्या पाहुण्याच्या यादीत प्रियांकाचे नावदेखील सामील आहे. प्रियांका हॉलिवूड अभिनेत्री मेगनची खूप चांगली मैत्रिण आहे. 
पाकिस्तानात लग्नाला नकार दिल्याने मुलीची हत्या

पाकिस्तानात लग्नाला नकार दिल्याने मुलीची हत्या

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ऑनर किलिंगची घटना घडली आहे. 26 वर्षीय एका इटालियन-पाकिस्तानी मुलीची तिच्या घरच्यांनी हत्या केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नातेवाईकासोबत लग्न करण्यास नकार दिल्याने मुलीचा खून करण्य़ात आला. सना चीमा असे या खून झालेल्या मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे पूर्ण परिवाराने अपघात झाल्याची बतावणी केली होती.
राजापोरा येथे पीडीपी नेत्याची गोळ्या घालून हत्या

राजापोरा येथे पीडीपी नेत्याची गोळ्या घालून हत्या

जम्मू काश्मीरमध्ये पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे (पीडीपी) माजी नेते गुलाम नबी पटेल यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. पुलवामा येथील राजापोरा येथे दहशतवाद्यांनी गुलाम नबी पटेल यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात त्यांचे दोन सुरक्षारक्षक जखमी झाले होते. गोळीबार केल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान गुलम नबी पटेल यांना रुग्णालयात घेऊन जाताना त्यांचा मृत्यू झाला.