Short News

थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. उप-उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिच्यावर 21-16, 21-14 असा सहज विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासून सिंधूने आक्रमक खेळावर भर देत तिने यश मिळाले. पहिल्या गेममध्ये यिनने सिंधूला चांगली लढत दिली. पण सिंधूने तिला कडवी झुंज देत पहिला गेम 21-16 असा जिंकला. 
माझ्या संघात आई-बहिणीवरुन शिव्या द्यायच्या नाहीत : धोनी

माझ्या संघात आई-बहिणीवरुन शिव्या द्यायच्या नाहीत : धोनी

भारत सुंदरेसन यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर पुस्तक लिहिले आहे. ‘The Dhoni Touch'असे या पुस्तकाचे नाव आहे. यात धोनीच्या स्वभावातील विविध पैलूंचा आढावा घेतलेला आहे. यष्टींमागून धोनी आपल्या गोलंदाजाना नेहमी सुचना देत असताना आपण पाहिले आहे. शांत डोक्याने धोनी प्रतिस्पर्धी संघाला मात देतो. कर्णधारपदाच्या काळात धोनीने संघातील खेळाडूंना शिव्या देण्याची परवानगी दिली नाही.
विठ्ठल-रुक्मिणीचे 3 तास दर्शन बंद, 70 मिनिटे चालणार शासकीय महापूजा

विठ्ठल-रुक्मिणीचे 3 तास दर्शन बंद, 70 मिनिटे चालणार शासकीय महापूजा

आषाढी वारीनिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. दोन्ही देवतांची महापूजा सुमारे 70 मिनिटे चालणार आहे. तत्पूर्वी मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसले यांच्या हस्ते विठ्ठल, रुक्मिणीची पाद्यपूजा, नित्यपूजा होणार आहे. पाद्यपूजा, नित्यपूजा आणि महापूजेसह मंदिराची साफ, सफाईसाठी 3 तास दर्शन बंद राहणार आहे.
'नफरत से नही, प्यार से जितेंगे', मुंबईत काँग्रेसचे पोस्टर'वॉर'

'नफरत से नही, प्यार से जितेंगे', मुंबईत काँग्रेसचे पोस्टर'वॉर'

आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी काँग्रेसने नवीन टॅगलाइनदेखील निश्चित केली आहे. या टॅगलाइनद्वारे काँग्रेस प्रत्येकपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. 'नफरत से नही, प्यार से जितेंगे',या टॅगलाइनसहीत मुंबई काँग्रेसने अंधेरी परिसरात राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीचे पोस्टर लावले. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more